'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेत एक थोडे वेगळे वळण आले आहे. कला आणि अद्वैत यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आहे. चांदेकर कुटुंबीय देवदर्शनाला गेले असताना कला आणि अद्वैत दोघांमध्ये जवळीक निर्माण होताना दिसत आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय होणार?
कलाच्या हातचे काहीच खाणार नाही असे अद्वैतने म्हटले असते. त्यामुळे तो ऑमलेट बनवायला घेतो. पण त्याला ऑमलेट कुठे बनवता येते. तो कसं बसं यूट्यूबवर बघून ऑमलेट बनवतो. तेही जळलेलं. कला तिने बनवलेली खिचडी देऊ का म्हणून विचारते पण अद्वैत नकार देतो. शेवटी रात्री तो आयस्क्रीमसोबत आणि आंबा खाऊन झोपतो. त्यानंतर अद्वैतची तब्बेत बिघडते.
वाचा: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्रीवेडिंगमधील पहिला व्हिडीओ आला समोर, 'बॅकस्ट्रीट बॉईज'चा धम्माल परफॉर्मन्स
राहुल, नैना, रोहिणी आणि सोहमची आई हे एका गाडीतून देवदर्शनासाठी निघाले असतात. उशिर झाल्यामुळे त्यांना रस्त्यात कोणतेही हॉटेल सापडत नाही. शेवटी कलाने दिलेले पराठे, लाडू आणि कोकम सरबत ते खातात. नैना हे सगळं खाण्यास नकार देते. तेव्हा सोहमच्या आईला प्रश्न पडतो की नैनाला भूक कशी लागली नाही. दोन जीवांची असल्यावर महिलांना भूक लागते, सतत काही तरी खावेसे वाटत असते. पण नैना यातले काहीच करत नाही. शेवटी नैना कोरड्या उलट्या होत असल्याचे सोंग करते.
वाचा: दाक्षिणात्य अभिनेत्याने शेजारी उभ्या असलेल्या अभिनेत्रीला दिला धक्का, Viral Videoने वेधले सर्वांचे लक्ष
अद्वैतची तब्बेत अचानक बिघते. तो कलाला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत असतो. पण कला काही उठत नाही. शेवटी अद्वैत बेडच्या शेजारी असलेला पाण्याचा ग्लास खाली पाडतो. त्याचा आवाज ऐकून कला उठते आणि अद्वैतला काय झाले आहे हे पाहाते. तिला काही सुचत नसते की नेमकं काय झाले आहे. शेवटी ती अद्वैतला रिक्षामध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तेथे गेल्यावर सर्वात आधी तिला पैसे भरण्यासाठी सांगतात. कलाकडे पैसे नसतात. त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये अद्वैतला अॅडमिट करुन घेण्यासाठी विनंती करते. आता तो अद्वैतला रुग्णालयात दाखल करणार का? कला एवढे पैसे कुठून आणणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.
वाचा: मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही; "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील"चा ट्रेलर प्रदर्शित
संबंधित बातम्या