मध्यरात्री बिघडली अद्वैतची तब्येत, काय करणार एकटी कला? 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेविषयी वाचा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मध्यरात्री बिघडली अद्वैतची तब्येत, काय करणार एकटी कला? 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेविषयी वाचा

मध्यरात्री बिघडली अद्वैतची तब्येत, काय करणार एकटी कला? 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेविषयी वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
May 31, 2024 05:05 PM IST

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आजच्या भागात अद्वैतची तब्बेत बिघडणार आहे. त्यामुळे कला काय करणार जाणून घ्या...

laxmichya paulanni: 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेविषयी
laxmichya paulanni: 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेविषयी

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेत एक थोडे वेगळे वळण आले आहे. कला आणि अद्वैतच्या भांडणाव्यतिरिक्त मालिकेत दुसरे काही पाहायला मिळणार हे ऐकून प्रेक्षकांना आनंद झाला आहे. पण मालिकेतील या रंजक वळणामुळे अद्वैत आणि कला एकत्र येणार का? असा प्रश्न मात्र सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात नेमके काय होणार...

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात हे नैनाने बनवलेल्या नाश्तापासून होते. नैनाला स्वयंपाक घरातील काहीच येत नसल्याची खात्री आबांना होते. त्यावरुन ते रोहिणीला चांगलेच ऐकवतात. इथून पुढे कला आणि नैनाची बरोबरी करताना दहा वेळा विचार कर असे बजावतात. तसेच नैनाला देखील घरातल्या कामांमध्ये लक्ष घालण्यास सांगितले आहे.
वाचा: 'इंडियाज बेस्ट डान्सर ४'साठी ऑडिशन द्यायची आहे? मग जाणून घ्या कधी आणि कुठे होणार

चांदेकर कुटुंबीय गेले देवदर्शनाला

कला आणि अद्वैतने एकमेकांसोबत वेळ घालवावा म्हणून आबा आणखी एक प्लान आखतात. ते सर्वांना घेऊन देवदर्शनाला जाणार असतात. पण अद्वैतची मिटिंग असल्यामुळे तो जाण्यास नकार देतो. आबा कलालाही अद्वैतसोबत राहण्यास सागंतात. त्यानंतर सगळे देवदर्शनाला निघतात. जाताना नैना घरातील नोकरांना देखील सुट्ट्या देते. कलाच्या अंगावर काम पडावे म्हणून नैनाने सगळ्यांना सुट्टी दिली आहे.
वाचा: अमोलमुळे अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार? 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत मोठा ट्विस्ट

अद्वैतने बनवले ऑमलेट

कलाच्या हातचे काहीच खाणार नाही असे अद्वैतने म्हटले असते. त्यामुळे तो ऑमलेट बनवायला घेतो. पण त्याला ऑमलेट कुठे बनवता येते. तो कसं बसं यूट्यूबवर बघून ऑमलेट बनवतो. तेही जळलेलं. कला तिने बनवलेली खिचडी देऊ का म्हणून विचारते पण अद्वैत नकार देतो. शेवटी रात्री तो आयस्क्रीमसोबत आणि आंबा खाऊन झोपतो.
Aavesham Review: एका गँगस्टरसोबतची मैत्री! जाणून घ्या काय आहे 'आवेशम' सिनेमाची कथा

अद्वैतची बिघडली तब्बेत

आयस्क्रीम आणि आंबा खाल्ल्यामुळे अद्वैतची प्रकृती बिघते. त्याला कसे तरी होऊ लागते. तो कलाला आवाज देण्याचा प्रयत्न करतो पण कलाला काही आवाज जात नाही. आता मालिकेत पुढे काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Whats_app_banner