मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रोहिणीने नैनाला घरातून बाहेर काढण्याचा आखला प्लान, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार वाचा

रोहिणीने नैनाला घरातून बाहेर काढण्याचा आखला प्लान, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
May 30, 2024 03:12 PM IST

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज नेमकं काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया आजच्या भागाविषयी...

laxmichya paulanni: रोहिणीने आखला प्लान
laxmichya paulanni: रोहिणीने आखला प्लान

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत सतत काही ना काही घडताना दिसत आहे. कधी अद्वैत आणि कलाची भांडणे सुरु असतात तर कधी चांदेकर कुटुंबीय आपापसात भांडत असतात. पण आबांमुळे चांदेकर एकत्र, गुण्यागोविंदाने राहत असल्याचे दिसत आहे. पण आता राहुल आणि नैनाचे लग्न झाल्यानंतर रोहिणीने नैनाला घराबाहेर काढण्याचा प्लान केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नैना आणि राहुलचे अफेअर होते. नैना गरोदर असल्यामुळे राहुलचे लग्न तिच्याशी लावून देण्यात आले. पण राहुल किंवा त्याची आई रोहिणी या लग्नाला तयार नव्हते. अनेक अडथळे आणूनही त्यांना नैनाला स्विकारावे लागले आहे. आता रोहिणीने नैनाला घराबाहेर काढण्याचा प्लान आखला आहे.
वाचा: तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल! 'आम्ही जरांगे' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

आबांनी केले कलाचे कौतुक

कला सकाळी उठल्यापासून चांदेकर कुटुंबीयांसाठी काम करत असते. सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवणे, कोणाला काय हवं काय नको हे पाहण्याचे काम करते. आबांना देखील आवडते. पण आबा सतत अद्वैत आणि कलाला पुढे करतात असे रोहिणीचे म्हणणे आहे. शेवटी आबा रोहिणीवर चिडतात आणि तिला सांगतात आजवर राहुलला अनेकदा संधी दिली पण त्याने त्या संधीचे कधीही सोने केले नाही. आता नैनालाही देतो. पण ती अपयशी ठरली तर इथून पुढे कधीही याविषयी बोलायचे नाही.
वाचा: हे निराशाजनक आहे; 'ऑल आइज ऑन रफा' पोस्ट माधुरीने डिलिट करताच नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

नैनाने बनवला स्वयंपाक

नैनाला स्वयंपाकतलं काहीच येत नाही. कला तिला मदत करत असते. पण आबा कलाला खोलीत जायला सांगतात. नैनाला स्वयंपाकातलं काहीच येत नसल्याचे सिद्ध होते. पण असे केल्यामुळे नैना आबांच्या नजरेतून उतरेल आणि तिला लवकर घराबाहेर काढता येईल असे रोहिणीला वाटत असते. म्हणून तिने हा डाव आखला आहे. आता रोहिणी यशस्वी होणार का? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
वाचा: नारीचा आत्मा काही वेगळ्याच कारणासाठी आला आहे; ‘अल्याड पल्याड'चा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित

चांदेकर जाणार देवदर्शनाला

कला आणि अद्वैतने एकमेकांसोबत वेळ घालवावा म्हणून आबा आणखी एक प्लान आखतात. ते सर्वांना घेऊन देवदर्शनाला जाणार असतात. पण अद्वैतची मिटिंग असल्यामुळे तो जाण्यास नकार देतो. आबा कलालाही अद्वैतसोबत राहण्यास सागंतात. कलाला तिच्यावर संकट कोसळल्यासारखे वाटते. आता या दोन दिवसात नेमके काय होणार? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४