मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  laxmichya Paulanni: राहुलने सर्वांसमोर आणले नैनाचे सत्य, काय घडणार 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत?

laxmichya Paulanni: राहुलने सर्वांसमोर आणले नैनाचे सत्य, काय घडणार 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 02, 2024 12:49 PM IST

laxmichya Paulanni Update: राहुलला नैनाला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढायचे असते. त्यामुळे तो कारणच शोधत असतो. अशात नैना सौरभला भेटायला जाते. ते पाहून राहुल चिडतो.

laxmichya Paulanni: 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'
laxmichya Paulanni: 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतील कला आणि अद्वैत प्रमाणेच राहुल आणि नैना देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतर असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. या मालिकेतील राहुल सर्वांसमोर नैनाला दोषी असल्याचे सिद्ध करतो.

ट्रेंडिंग न्यूज

काजोलमध्ये झाले बदल

काजोलला कॅफेमध्ये नोकरी मिळाल्यामुळे तिचे वागणे, बोलणे सगळेच बदलले आहे. ती घरात साफसफाई करत असते. काजोलचे हे वागणे बघून तिच्या आईला धक्काच बसतो. काजोल इतकी समजूतदार झाली हे पाहून तिच्या आईला आनंद झाला आहे. तिला काजोलचे कौतुक वाटत आहे. एक दिवस काजोल चांगले मोठे हॉटेल उघडेल असे स्वप्न तिची आई आणि ती पाहात आहे.
वाचा: अशोक सराफ यांचा अनोखा लूक, 'लाईफलाईन' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

अद्वैत आणि कलामध्ये तू तू मै मै

कलाच ते डिझाइन काढत असल्याची शंका अद्वैतला आली आहे. त्यामुळे तो ऑफिसमधून कलाला फोन लावायला सांगतो. पण कला देखील हुशार आहे. ती आवज बदलून अद्वैतशी बोलत असते. पण तरीही अद्वैतच्या मनात शंका कायम आहे. तो घरी कलाला ऑफिसमध्ये घडलेला प्रकार सांगतो. त्यावर देखील असतात असे बरेच पुरुष जे बायकांना अशी वागणूक देतात असे बोलते. नंतर ती अद्वैतला आयतं खाऊ बोलून निघून जाते. अद्वैतच्या मनाला ते लागते. तो कलाला भाजी कापण्यासाठी वैगरे मदत करायला जातो. पण त्याचे वागणे पाहून कलाला आनंद होता.
वाचा: डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात 'हे' हिंदी चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

राहुलने सर्वांसमोर नैनाला जाब विचारला

नैनाला तिसरा महिना सुरु झाला असेल याची आठवण कलाला होते. ती सर्वांसमोर कलाला काय खायचं आणि काय नाही याची आठवण करुन देते. तेवढ्यात रजनी देखील तिला सोनोग्राफीची आठवण करुन देते. आबा कोल्हापूरातील सर्वात मोठ्या डॉक्टरांकडे नैना जाण्यास सांगतात. पण इतर कोणत्याही डॉक्टरकडे गेली तर सत्य सर्वांसमोर येईल असे नैनाला वाटते. त्यामुळे ती नकार देते. या सगळ्यात ती सौरभची मदत घेते. ती सौभरला भेटायला कॅफेमध्ये जाते. राहुल देखील तिचा पाठलाग करतो. नैना आणि सौरभला एकत्र पाहून राहुल चिडतो. तिला रागाच्या भरात खेचत घरी आणतो.
वाचा: १२ वर्षांचं प्रेम आणि वाचवायला फक्त ५ तास, 'विषय हार्ड'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

नैनाने सौरभ हा तिचा डॉक्टर मित्र आहे असे सांगितले आहे. तसेच ते दोघे कॉजेलमध्ये एकत्र असल्याचे देखील नैना सांगते. तसेच हे सगळे राहुलमुळे होत असल्याचे देखील नैना सांगते. तो तिच्याकडे लक्ष देत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहे असे देखील नैना बोलते. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

WhatsApp channel