चांदेकर जाणार देव दर्शनाला, कला आणि अद्वैत दोघच घरात एकटे! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  चांदेकर जाणार देव दर्शनाला, कला आणि अद्वैत दोघच घरात एकटे! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये काय घडणार?

चांदेकर जाणार देव दर्शनाला, कला आणि अद्वैत दोघच घरात एकटे! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published May 29, 2024 04:11 PM IST

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत अद्वैत आणि कलाला एकत्र आणण्यासाठी आबा प्रयत्न करत आहेत. पण सरोज या सगळ्याला विरोध करत आहे. त्यामुळे मालिकेच्या आजच्या भागात काय होणार जाणून घ्या...

laxmichya paulanni:  कला आणि अद्वैत दोघच घरात एकटे
laxmichya paulanni: कला आणि अद्वैत दोघच घरात एकटे

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतील कला खरे ही सतत अद्वैत चांदेकरला मदत करताना दिसते. पण दोघांचाही छत्तीसचा आकडा असल्यामुळे दोन मिनिटेही पटत नाही. त्यात कलाच्या खोलीत उंदीर आल्यामुळे तिला अद्वैतच्या खोलीत राहावे लागले. आबांनी घराचे पेस्ट कंट्रोल तर करुन घेतले पण त्यांना कलाने अद्वैतच्या खोलीत रहावे असे वाटत आहे. त्यामुळे त्यांनी सोहमसोबत मिळून एक प्लान केला आहे.

कला निघाली खोतील जायला

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये कला ही सकाळी उठते आणि तिचे संपूर्ण सामान गोळा करते. ती बॅग भरत असल्याचे पाहून अद्वैतला आनंद होतो. तो कलाला मदत करण्यासाठी तिची गादी उचलून खाली घेऊन जातो. कलापासून सुटका मिळणार असल्यामुळे अद्वैत प्रचंड खूश असतो. कला देखील स्वत:च्या खोलीत जाण्यासाठी आतुर असते.
वाचा: भाऊ, पाय पुरतात का?; नवी गाडी खरेदी केल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे झाला ट्रोल

बाबांनी कलाच्या खोलीत ठेवले सामान

कला आणि अद्वैतला एकत्र आणण्यासाठी सोहम व आबांचे प्रयत्न सुरु असतात. ते दोघेही घरातील इतर खोल्यांमधील सामान हे उचलून कलाच्या खोलीत नेऊन टाकतात. त्या खोलीला कुलूप लावून ठेवतात. तेवढ्यात कला आणि अद्वैत तेथे येतात. आबा त्यांना ती खोली दाखवतात आणि कलाला पुन्हा अद्वैतच्या खोलीमध्ये राहण्यासाठी जायला सांगतात. तसेच तुलाचा काही समस्या आहे का अद्वैतच्या खोलीत राहण्यास असा प्रश्न देखील करतात. कला आबांना मला काही समस्या नाही असे उत्तर देते.
वाचा: अरे हाय काय अन् नाय काय;'गेला माधव कुणीकडे' नाटक पुन्हा पाहायचे? मग ही बातमी नक्की वाचा

चांदेकर जाणार देवदर्शनाला

कला आणि अद्वैतने एकमेकांसोबत वेळ घालवावा म्हणून आबा आणखी एक प्लान आखतात. ते सर्वांना घेऊन देवदर्शनाला जाणार असतात. पण अद्वैतची मिटिंग असल्यामुळे तो जाण्यास नकार देतो. आबा कलालाही अद्वैतसोबत राहण्यास सागंतात. कलाला तिच्यावर संकट कोसळल्यासारखे वाटते. आता या दोन दिवसात नेमके काय होणार? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: 'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक

खरेंवर कोसळले आर्थिक संकट

आधीच्या लग्नासाठी आणि आता नैनाच्या लग्नासाठी कलाच्या आई-वडीलांनी कर्ज घेतलेले असते. त्याचा हफता न दिल्यामुळे ते खरेंच्या घरी येतात. ते कलाच्या आईला हफ्ते का भरले नाहीत असे विचारतात. पण त्या मुदत मागत असल्यामुळे शेवटी कलाची गाडी ते उचलून घेऊन जातात. काजू ती गाडी परत आणण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला आई समजावते आणि सगळं काही बदलते. त्यानंतर आता काजू पैसे कमावण्याचा विचार करते.

Whats_app_banner