'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीला उतरताना दिसते. या मालिकेतील पात्र देखील प्रेक्षकांच्या मनात उतरत आहेत. या मालिकेतील कलाने तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. आता या मालिकेत थोडे रंजक वळण आले आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार?
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही नैनाच्या खोलीपासून होते. नैना मोठ्यामोठ्याने गाणी लावून खोलीमध्ये उड्या मारत एक्ससाइज करत असते. आबा, कला, अद्वैत, राहुल, रोहिणी जवळपास सर्वचजण नैना काय करते हे पाहायला तिच्या खोलीत जातात. तेव्हा असे कळते की नैना ही गाणी लावून एक्ससाइज करते. राहुल तिला थांबवतात. पण हे सगळं पाहून कलाच्या मनात शंका येते.
वाचा: प्रभास आणि दीपिकाचा 'कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट कसा आहे? वाचा रिव्ह्यू
काजोल घरची परिस्थिती पाहून नोकरीच्या शोधात असते. ती सोहमकडे नोकरी मागत असते पण त्यांचे बोलणेच होत नाही. शेवटी कॅफेमध्ये तिला नोकरी मिळते. आज काजोलच्या कामाचा पहिला दिवस आहे. ती कॅफेची साफसफाई करुन पिझ्झा डिलिवरीसाठी जाते. सोहम ते पाहातो. सोहम त्या कॅफेच्या मॅनेजकडे जाऊन पिझ्झाची ऑर्डर देतो आणि काजोलला मदत करतो.
वाचा: 'संसदेत गदारोळ झाला होता', शर्मिला टागोर यांच्या बिकिनी फोटोशूटवर पतीची काय होती प्रतिक्रिया?
कलाही अद्वैतच्या कंपनीसाठी काम करत असते. ती स्वामीनाथन यांनी मागितलेल्या डिझाइनवर काम करते. पण या सगळ्याची जराही भनक अद्वैतला लागू द्यायची नाही असे ठरवते. त्यामुळे ती अद्वैत झोपल्यानंतर वैगरे डिझाइन काढत असते. पण अद्वैतला हे सर्व डिझाइन कला काढत असल्याचे कळते. तो कलाला ते डिझाइन काढताना पकडायचे असते. पण कला देखील हुशार आहे. आता ती पकडली जाणार की नाही हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
वाचा: बॉडीगार्डची 'ती' चूक नागार्जुनने सुधारली, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
संबंधित बातम्या