स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही मालिका सध्या सर्वांची मने जिंकत आहे. कला आणि अद्वैतचे नाते पाहायला सर्वांना आवडत आहे. आता त्यांच्या नात्यामध्ये थोडी सुधारणा झाल्याचे देखील दिसत आहे. आता मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. कलाचे सत्य अद्वैतसमोर आले आहे. त्यामुळे मालिकेच्या आजच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही काजोल आणि सोहम एका कॅफेमध्ये भेटल्यापासून होते. काजोल घरची परिस्थिती पाहून नोकरीच्या शोधात असते. ती सोहमकडे नोकरी मागत असते पण त्यांचे बोलणेच होत नाही. सोहमला सारखे फोन येत असतात. तेवढ्यात काजोल कॅफेमध्ये डिलिवरी बॉयची गरज असल्याची नोटीस वाचते. ती कॅफे मालकाकडे जाऊन नोकरी मागते आणि तिला ती मिळते.
वाचा : प्रभास आणि दीपिकाचा 'कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट कसा आहे? वाचा रिव्ह्यू
जेवायला बसताना रोहिणीला तिचा भाऊ प्रदीपची आठवण येते. ती सरोजला टोमणा मारते आज प्रदीप दादाचा पत्ताही नाही. कशाला त्याच्यासाठी उपावस करते असे ती बोलते. सरोज ते ऐकून चिडते. त्यावर रोहिणी स्पष्ट बोलते माझी माझ्या नवऱ्याला सोडून यायची हिंमत होती तुझी तिही नाही. मला हव्या असलेल्या माणसाशी लग्न लावून दिले असते तर आज ही वेळही आली नसती माझ्यावर असे ही रागाच्या भरात रोहिणी बोलते. या दोघींची भांडणे पाहून कलाला नेमकं प्रकरण काय आहे? असा प्रश्न पडला आहे. आता कला प्रकरणात डोकं घालणार का? हे पाहणे मालिकेच्या आगामी भागात रंगतदार ठरणार आहे.
वाचा : अभिषेक बच्चन पाठोपाठ अमिताभ यांनी खरेदी केली कमर्शियल प्रॉपर्टी, किंमत ऐकून बसेल धक्का
कलाही अद्वैतच्या कंपनीसाठी काम करत असते. ती स्वामीनाथन यांनी मागितलेल्या डिझाइनवर काम करते. पण या सगळ्याची जराही भनक अद्वैतला लागू द्यायची नाही असे ठरवते. त्यामुळे ती अद्वैत झोपल्यानंतर वैगरे डिझाइन काढत असते. पण अद्वैतला हे सर्व डिझाइन कला काढत असल्याचे कळते. आता अद्वैत मालिकेत पुढे काय करणार हे पाहण्यासारखे आहे.
वाचा : गौरव मोरेच्या 'अल्ल्याड पल्ल्याड'ची हिंदी सिनेमांनाही टक्कर, बॉक्स ऑफिसवर धुकमाकूळ
संबंधित बातम्या