'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत कलाची सतत परीक्षा सुरु असते. कधी चांदेकर कुटुंबीय तिला घालून पाडून बोलताना दिसतात. तर कधी तिच्यावर दुसरे संकट कोसळते. पण सध्या मालिकेत एक वेगळा ट्रॅक पाहायला मिळत आहे. कलाने अद्वैतसाठी वडाची पूजा तर केली आहे. पण तिच्या मनात काही वेगळ्या गोष्टी सुरु आहेत.
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' आजच्या भागाची सुरुवात हे नैनाने राहुलसाठी बनवलेले दूध आणि कलाने अद्वैतसाठी बनवलेल्या दूधात अदलाबदल झाल्यापासून होते. नैनाला राहुलच्या जवळ जायचे असते. त्यामुळे ती त्याच्या दूधात गुंगीचे औषध टाकते. पण ते दूध चुकून अद्वैत पितो. त्यामुळे सगळा घोळ सुरु होतो.
वाचा: लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा स्विकारणार का मुस्लिम धर्म? जहीरच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया
नैनाने गुंगीचे औषध टाकलेले दूध अद्वैत प्यायलामुळे गोंधळ झाला आहे. त्याला गुंगी आली आहे. कला अद्वैतला सावरण्याचा प्रयत्न करत असते पण तो काही ऐकत नाही. एक वेळ तर अशी येते की कालाच्या जवळ जातो. त्याला थांबवता थांबवता कला आणि अद्वैत बेडवर पडतात. कला अद्वैतला कसे बसे सावरते. त्यासगळ्यामध्ये अद्वैत कलाचे मंगळसूत्र खेचतो. ते मंगळसूत्र तुटते.
वाचा: जमिनीवर बसून अनिल कपूरचा सोनाक्षीसोबत डान्स, जहीरने छैय्या-छैय्यावर डान्स करत केले इम्प्रेस
राहुलच्या जवळ जाण्यासाठी नैना दूधात गुंगीचे औषध टाकते. पण राहुल ऐवजी ते दूध अद्वैत पितो. नैना वाट पाहात असते की राहुलला कधी गुंग येईल. मात्र, असे काहीच होत नाही. त्यामुळे नैना आणखी चिडते. आता ती पुन्हा नवा काय ड्रामा करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने रिसेप्शनला नेसली लाल रंगाची साडी, किंमत ऐकून बसेल धक्का
कलाची पहिली वटपौर्णिमा असल्यामुळे आबा सरोजला तिच्यासाठी नवी साडी आणण्यासाठी सागंतात. सरोज तोंड वाकडं करते. त्यामुळे कला तिची साडी आणते. आबांनी बोलावल्यावर ती खोलीतून खाली येते. पण तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे सर्वांच्या लक्षात येते. आबा अद्वैतला तिच्यासाठी नवे मंगळसूत्र आणायला सांगतात आणि तिच्या गळ्यात घालायला सांगतात. अद्वैत देखील ते सर्वांसमोर घालतो. पण जेव्हा कला वडाची पूजा करत असते तेव्हा तिच्या मनात एकच विचार येतो की अद्वैत आणि तिचे नेमके नाते काय आहे? काय होणार भविष्यात याची चिंता कलाला वाटू लागते.
संबंधित बातम्या