मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  laxmichya Paulanni: अद्वैतने कलाची मागितली माफी, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत रंजक वळण

laxmichya Paulanni: अद्वैतने कलाची मागितली माफी, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत रंजक वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 24, 2024 12:49 PM IST

laxmichya Paulanni Serial Update: 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत रंजक वळण आले आहे. अद्वैत आणि कलामध्ये जवळीक निर्माण झाली आहे.

laxmichya paulanni: अद्वैतने मागितली कलाची माफ
laxmichya paulanni: अद्वैतने मागितली कलाची माफ

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत सध्या रंजक वळण आले आहे. सतत भांडणारे कला आणि अद्वैत हे एकमेकांच्या जवळ येणार असल्याचे दिसत आहे. ते पाहण्यासाठी प्रेक्षक हे मालिकेच्या पहिल्या दिवसापासून आतुर आहेत. आता अखेर तो क्षण आला आहे. चला जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

ट्रेंडिंग न्यूज

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही कला काजोलला निर्दोषी सिद्ध करताना होते. कला पेढीवर जाऊन अद्वैतच्या लॅपटॉपमधून सगळे सीसीटीव्ही फूटेज घेते आणि सर्वांना दाखवते. त्यामध्ये सदा काजोलच्या बॅगेत अंगठ्या टाकताना दिसत आहे. त्यामुळे काजोलही निर्दोषी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काजोलला ते पाहून प्रचंड आनंद झाला आहे.
वाचा: सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत; ‘ठरलं तर मग’मधील सहाय्यक दिग्दर्शकाच्या निधनानंतर जुई गडकरीची पोस्ट

चांदेकर कुटुंबीयांनी मागितली खरेंची माफी

काजोल ही निर्दोषी सिद्ध होताच आबा हात जोडून तिच्या आई-वडिलांची माफी मागतात. ते पाहून कला त्यांना थांबवते. पण आबा मात्र कोणाचेही ऐकत नाहीत. त्यानंतर अद्वैत देखील जे झाले त्याबद्दल माफी मागतो. आबा श्रीकांतला देखील माफी मागायला लावतात. त्याला कमीपणा वाटतो. तो माफी मागून रागाच्या भरात तेथून निघून जातो.
वाचा: 'अभिनेत्रीच्या ओठांचा कुत्र्याने घेतला चावा', रिअॅलिटीशोमध्ये सांगितला भीतीदायक प्रसंग

कलाने बोलावले पोलिसांना

सदाने काजोलच्या बॅगेत अंगठ्या का ठेवल्या याचा छडा घेण्यासाठी कलाने पोलिसांना बोलावले आहे. ते पाहून माधवी चिते. सदाची चौकशी केली तर सत्य सर्वांसमोर येईल याची भीती तिच्या मनात येते. त्यामुळे हे सगळे प्रकरण इथेच थांबवावे असे ती बोलत असते. पण आबा मात्र तिचे काही ऐकत नाही. सदाला पकडून त्याची कसून चौकशी करा असा आदेश आबा देतात. आता सदा सत्य सांगणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: मल्लिकाजान मनीषा कोईरालाकडून सोनाक्षी सिन्हाला मिळाले मोठे गिफ्ट, जाणून घ्या काय मिळाले

कला आणि अद्वैत आले जवळ

नैनाला सतत सौरभचा फोन येत असतो. त्यामुळे ती चिडलेली असते. ती गर्भवती असल्याचे नाटक करत असते. पण आता तिला खरत प्रेग्नंट व्हायचे आहे. त्यामुळे ती राहुलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. ती डॉक्टरकडून गुंगीचे औषध आणते आणि राहुलच्या दूधात टाकते. कला पण अद्वैतसाठी दूध ठेवते. अद्वैत चुकून राहुलचे दूध पितो आणि त्याला गुंगी चढते. त्यानंतर अद्वैत खोलीमध्ये जाऊ आणि कलाच्या जवळ जातो.

WhatsApp channel