स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही मालिका सर्वांची मने जिंकताना दिसत आहे. या मालिकेने टीआरपी यादीमध्ये देखील अव्वळ स्थान पटकावले आहे. तसेच मालिकेतील कला आणि अद्वैतची जोडी देखील सर्वांच्या पसंतीला उतरताना दिसते. आता मालिकेत आठवडाभरात काय घडले चला जाणून घेऊया..
चांदेकरांनी त्यांच्या पेढीवर पूजा ठेवलेली असते. त्यासाठी सर्वांना आमंत्रण देण्यात येते. कला आणि तिच्या कुटुंबीयांना देखील पूजेसाठी बोलवण्यात आले होते. पण कलाच्या कुटुंबीयांना कसा कमीपणा दाखवता येईल, त्यांची बदनामी कशी होईल यासाठी माधवी डाव आखते. तिने पेडीवरील एका कामगाराला सांगून काजोलच्या बॅगेत सोन्याच्या दोन अंगठ्या टाकल्या आहेत. त्यानंतर जेव्हा दोन अंगठ्या चोरी झाल्याचे कळाले तेव्हा तिने खरेंना आरोपी असल्याचे म्हटले. कला या सगळ्याला विरोध करते. पण पोलीस तपास करत असतात तेव्हा त्यांना सगळ्या अंगठ्या काजोलच्या बॅगेत सापडतात. ते काजोलला घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन जातात.
वाचा: 'रेखाकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही', शबाना आझमी यांनी दिग्दर्शकाला विचारला होता प्रश्न
आबा सगळी चौकशी थांबवतात आणि काजोलला घरी जाण्यास सांगतात. कला हे सगळे सुरु असताना अद्वैतकडे मदत मागते पण तो ती नाकारतो. त्यानंतर कला ठरवते की काजोलला निर्दोषी सिद्ध करायचे. त्यासाठी आबा अद्वैतला कलाला लागेल ती मदत करण्यास सांगतात. कला सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना तिला एका कर्मचाऱ्यावर संशय येतो. ती त्याला चौकशीसाठी बोलावते. त्याच्या बोलण्यावरुन तो काही तरी लपव असल्याचे कलाला जाणवते. ती आबांना आणि अद्वैतला सांगते. पण चांदेकर कुटुंबीय पुन्हा कलाचे काही ऐकून घेत नाहीत.
वाचा: पाच जन्मातील बायका एकाच जन्मात! स्वप्नील जोशीच्या 'बाई गं'चा टीझर चर्चेत
कला मध्यरात्री अद्वैतला घेऊन पेढीवर जाते. त्याच्याकडे तेथील सीसीटीव्ही फूटजे पाहायला मागते. कलाला खात्री असते की तिला इतर फूटेजमध्ये काही तरी मिळेल. शेवटी सीसीटीव्ही फूटेजमध्ये काजोलच्या बॅगेत त्या अंगठ्या एका कर्मचाऱ्याने ठेवल्याचे सिद्ध होते. सर्व चांदेकर कुटुंबीय आणि खरे कुटुंबीयांना हे पाहून धक्का बसतो. काजोलला कलाने निर्दोषी सिद्ध केल्यावर आता तो कर्मचारी हे काम माधवीने करायला सांगितले हे सांगणार का? संपूर्ण सत्य सर्वांसमोर येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. येत्या भागात तेही कळणार आहे.
वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकाराचा १६ वर्षांनी मालिकेला रामराम, चाहत्याची पोस्ट
संबंधित बातम्या