कलाने अद्वैतला बिझनेसमध्ये मदत करण्याचा केला प्रयत्न; 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत नवे वळण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कलाने अद्वैतला बिझनेसमध्ये मदत करण्याचा केला प्रयत्न; 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत नवे वळण

कलाने अद्वैतला बिझनेसमध्ये मदत करण्याचा केला प्रयत्न; 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत नवे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
May 22, 2024 03:05 PM IST

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. कलाने थेट अद्वैतच्या कामात दखल घातली आहे. आता अद्वैतची काय असेल प्रतिक्रिया जाणून घेऊया...

laxmichya paulanni: कला करणार अद्वैतला मदत
laxmichya paulanni: कला करणार अद्वैतला मदत

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अद्वैत चांदेकर आणि कला खरे ही जोडी प्रेक्षकांची मने जिंकत आहे. दोघांमध्ये सतत सुरु असलेली तू तू मै मै प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता कलाने थेट अद्वैतच्या कामात दखल घातली आहे. यावर अद्वैतची काय प्रतिक्रिया असणार हे जाणून घेऊया...

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही कला आणि अद्वैत एकाच खोलीत झोपण्यापासून होते. रात्री बराच उशिर झाल्यामुळे कलाला पहाटे झोप लागत नाही. ती थेट उठून खाली जाते आणि स्वयंपाक घरात काम करायला लागते. अद्वैतची ऑफिसमध्ये आज महत्त्वाची मिटिंग असते. पण त्याला उशिर होता. तो अंघोळीला जातो. तेवढ्यात कला तेथे येते. तिला पाहून तो लाजतो आणि समोर असलेला बेडशीट अंगाभोवती गुंडाळतो. तेव्हाही दोघांमध्ये तू तू मै मै सुरु असते.
वाचा: 'इसको बोलते है....', बिग बॉस मराठीमध्ये महेश मांजरेकरांची जागा रितेशने घेताच शेवंताने केली कमेंट

अद्वैत करुन घेणार बंगल्याचे पेस्ट कंट्रोल

कलाच्या खोलीत उंदिर आल्यामुळे आबांनी तिला अद्वैतच्या खोलीत राहण्याची परवानगी दिली. पण तिच्या खोलीतला उंदीर लवकरात लवकर कसा घालवता येईल याकडे अद्वैतचे लक्ष असते. तो पेस्ट कंट्रोल करुन देणाऱ्या लोकांना बोलावतो. पण यासगळ्यासाठी जवळपास २४ तास लागतील असे ते सांगतात. त्यावर अद्वैत त्यांना जास्त पैसे देण्याचे अमिश दाखवतो आणि काम करुन घेतो. पण शेवटी काम करणारे कामगार हे सगळं शक्य नाही असे बोलून २४ तास लागतील सांगतात.
वाचा: नेहमी तर आईसोबत दिसते, मग शाळेत कधी जाते?; आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याचे उत्तर

अद्वैत विसरला जेवणाचा डब्बा

सकाळी उठायला उशिर झाल्यामुळे अद्वैत घाईघाईत ऑफिसला निघून जातो. त्यामुळे आबा कलाला तो डब्बा घेऊन ऑफिसला जाण्यास सांगतात. कला ऑफिसला पोहोचते तेव्हा अद्वैत चिडचिड करत असतो. त्याचेकडे मिटिंगसाठी कोणतेही खास बनवलेले डिझाइन नसते. कला अद्वैतला डब्बा देताना मी तुला मदत करु शकते असे बोलते. पण अद्वैत तिची मदत नकारतो. शेवटी संध्याकाळी तिच मिटिंग पुन्हा चांदेकरांच्या घरी ठेवण्यात येते. आता कला चांदेकरांच्या घरी मिटिंगला आलेल्या क्लायंटला तिचे डिझाइन दाखवणार का? अद्वैत कलाला मदत करु देणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Gui Gadkari Health: अभिनेत्री जुई गडकरी अजूनही आजारीच, चाहतीच्या कमेंटवर दिले उत्तर

Whats_app_banner