कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published May 20, 2024 03:29 PM IST

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत अद्वैत चांदेकर आणि कला खरे यांची तू तू मै मै सतत सुरु असते. पण आजच्या भागात काही मजेशीर गोष्टी पाहायला मिळणार आहे.

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा
कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेतील अद्वैत चांदेकर आणि कला खरे ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. दोघांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहे. नियतीने त्यांचे लग्न तर जुळवून आणले पण दोघेही सतत भांडताना दिसतात. पण चांदेकर कुटुंबीयांना आता त्यांच्या भांडणाची चांगलीच सवय झाली आहे. चला जाणून घेऊया 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार.

अद्वैतने कलाला उंदीर असलेल्या खोलीत ठेवले कोंडून

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही कला अद्वैतच्या खोलीमध्ये राहायला आल्यापासून होते. पण अद्वैतच्या खोलीत एकच बेड असतो. त्यामुळे एका बेडवर कसे झोपणार? असा प्रश्न कलाला पडतो. ती अद्वैतला खालच्या खोलीत घेऊन जाते आणि ती गादी आणते. दरम्यान, कला गाडी आणयला खोलीत गेल्यावर अद्वैत दार बाहेरुन लावून घेतो. कला प्रचंड घाबरते आणि जोरजोरात ओरडू लागते. शेवटी अद्वैत दार उघडतो तेवढ्यात कला त्याच्या माठीत पडते.
वाचा: उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

काजू आली चांदेकरांच्या घरात

कलाची सर्वात धाकटी बहिण काजूचा पेपर असतो. पण तिचा काहीच येत नसतं. त्यामुळे ती मध्यरात्री कलाकडे येण्याचा निर्णय घेते. तेवढ्यात बाहेर तिला सोहम दिसतो. त्याला पाहून ती आनंदी होते. दोघेही सोहमच्या खोलीमध्ये बसतात. सोहम काजूला गणिते सोडवण्यात मदत करत असतो आणि काजून सोहमचे राहिलेले चित्र पूर्ण करत असते. दरम्यान दोघांमध्ये मजामस्ती सुरु होते. पण त्यांचा आवाज अद्वैत आणि कलाच्या खोलीपर्यंत जातो. कला काजूला चांगलेच सुनावते. तसेच अद्वैत सोहमला काजूला घरी सोडून ये असे बजावतो.
वाचा: अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

राहुलने नैनाला विचारले प्रेग्नंसी संबंधी प्रश्न

नैना ही प्रेग्नंट असल्याचे खोटे सांगून राहुलशी लग्न करते. पण तिचे सत्य अद्याप समोर आलेले नाही. प्रेग्नंट असताना देखील नैना डायट करत असल्याचे राहुलला कळते. तेव्हा तो तिला विचारतो, प्रेग्नंट महिला तीन वेळा छान पोटभर जेवतात. पण, तू मात्र इतकं का डायट करते. नैना कसंबसं राहुलला गुंडाळते आणि इथून पुढे काळजी घेण्याचे मनात ठरवते. आता नैनाचे सत्य सर्वांसमोर येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. येत्या भागात चाहत्यांना त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.
वाचा: मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

Whats_app_banner