'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतील चांदेकरांनी खरेंवर चोरीचा आरोप केला. इतकच नव्हे तर खरेंची धाकटी मुलगी काजोलला चोरीचा आरोपाखाली पोलीस ठाण्यात जावे लागले. पण कलाने आपली बहिण चोरी करु शकत नाही आणि हे मी सिद्ध करुन दाखवेन असे ठरवले आहे. त्यामुळे कला ही पुरावे शोधत असते. आता आजच्या मालिकेच्या भागात काय घडणार जाणून घेऊया...
काजोल ही निर्दोष असल्याचे सांगूनही अद्वैतने एक अक्षरही काढले नाही म्हणून कलाला राग आला आहे. तिने अद्वैतशी बोलणे टाकले आहे. अद्वैत काम करत असताना रात्री कला झोपायला येते. पण लाईट डोळ्यावर येत असताना ती बंद करते. पण अद्वैत उठून ती पुन्हा लावतो. कला एकही अक्षर न काढता जागेवर जाऊन झोपते. कलाचे हे वागणे अद्वैतला थोडे वेगळे वाटते. त्यानंतर नाश्ता करत असताना देखील कला अद्वैतशी बोलत नाही.
वाचा: 'कथेमध्ये आम्ही थोडा बदल करायचो', शाहरुख खान लेक अबरामला सांगायचा महाभारतातील कथा
अद्वैतशी न बोलताच ती गाडीत बसून ऑफिसमध्ये जाते. ती तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांशी गप्पा मारते. त्यादरम्यान कलाला कळते की ऑफिसमधल्या एका कर्मचाऱ्याने अचानक सुट्टी घेतली आहे. कोणतेही कारण नसताना. त्यानंतर कला आबांकडून ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी मागते आणि त्या कर्मचाऱ्याविषयी सांगते. अद्वैतला कलाचे वागणे पटत नाही. पण आबांच्या पुढे त्याचे काही चालत नाही.
वाचा: ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात, जुई गडकरीने पोस्ट करत केले आवाहन
ऑफिसमधून सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्याचा कला नंबर घेते आणि त्याला फोन करते. फोनवर ती फार काही बोलत नाही. ती त्याला ऑफिसमध्ये येण्याची विनंती करते. तो देखील मॅडमचा आदेश मानून ऑफिसमध्ये येतो. कला त्याला आल्यावर घडलेल्या प्रकाराविषयी विचारते. त्यावर तो मला काही माहिती नसल्याचे भीत भीत उत्तर देतो. कलाला थोडी शंका येते. ती पुन्हा सीसी टीव्ही फूटेज तापसण्यासाठी जाते. आता कला बहिणीला निर्दोषी सिद्ध करेल का? अद्वैतचे पुढचे पाऊल काय असेल? हे मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: कसला बॉम्ब पडलाय यार; आई-बाबा होणाऱ्या निपूण-वैदेहीची गोष्ट! 'एक दोन तीन चार'चा टीझर प्रदर्शित
संबंधित बातम्या