'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत कला आणि तिच्या कुटुंबीयांची नेहमीच परीक्षा सुरु असते. चांदेकर कुटुंबीय हे श्रीमंत घराणे आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील श्रीकांत आणि सरोज हे कायमल कलाला आणि खरे कुटुंबीयांना कमीपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात राहुलची आई तर कलावर नेहमीच सूड उगवत असते. आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय होणार?
चांदेकर हे कोल्हापूरातील सोन्याचे व्यापारी असतात. त्यांच्या अनेक सोन्याच्या पेड्या आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर दागिने डाझाईन करतात आणि विकतात. एका नव्या पेढीच्या उद्घाटनासाठी सर्वांना बोलावण्यात येते. रोहिणी याचे निमित्त साधते आणि खरेंवर चोरीचा आरोप केला आहे. पेढीवर झालेली चोरी ही कलाच्या कुटुंबातील कोणी तरी केली असल्याचे रोहिणी बोलत असते.
वाचा: संजनाची तक्रार करून काय होणार? ३०० शब्दांचा निबंध लिहून सुटेल; ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर प्रेक्षक संतापले
पेढीवर चोरी झाल्याचे कळताच रोहिणी पोलिसांना बोलावते. ती सर्वांची झडती घ्यायला सांगते. त्यामध्ये सर्वात आधी पेढीवरील कामगारांना बाजूला ठेवून कलाच्या आई-बाबांना उभा केले जाते. कला ते पाहून रडू लागते. एकवेळ आम्ही उपाशी राहू पण कधी चोरी करणार नाही असे बोलत असते. पण रोहिणी आमची देखील तपासणी होणार असल्याचे म्हणते आणि ज्याला कर नाही त्याला डर कशाला असे देखील म्हणते. त्यावर कलाही काही बोलू शकली नाही.
वाचा: ‘शरद पवार माझे आवडते नेते, तीन मिनिटात त्यांनी माझे काम केले’, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
सीसीटीव्ही फूटेज पाहण्यासाठी सरोज, आबा, अद्वैत आणि श्रीकांत पोलिसांना घेऊन जाता. त्या फूटेजमध्ये काजोल दुकानात पूजा सुरु असताना खाली पडलेल्या अंगठ्या उचलताना दिसते. त्यानंतर तेथे काय होते हे फूटेजमध्ये दिसत नाही. सगळेजण काजोलला दोषी ठरवतात. रोहिणी आणि सरोज खरे कुटुंबीयांना घालून पाडून बोलतात. कलाच्या आईला रडू कोसळते.
वाचा: बॉक्स ऑफिसवर शर्वरी वाघची जादू, 'मुंज्या' चित्रपटाने आठ दिवसात कमावले इतके कोटी!
काजोलला पोलीस घेऊन जातात. तिची पोलीस कसून चौकशी करतात. अद्वैत आणि आबा हे सगळं पाहात असतात. कला अद्वैतला जाब विचारते तू हे सगळं कसं शांतपणे पाहू शकतोस. कृपया हे थांबव. त्यावर अद्वैत काहीच बोलत नाही. सरोज निमित्त साधून पुन्हा कलाला ऐकवते. तेव्हा कला सगळ्यासमोर शपथ घेते की मी काजोलला निर्दोषी सिद्ध करेन. आता मालिकेच्या आगामी भागात कला काजोलला निर्दोषी सिद्ध करणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या