'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतील कला ही सर्वांची लाडकी आणि आवडती सून झाली आहे. तिचा आणि अद्वैतचा बाँड हा सर्वांना पाहण्यास मजा येत आहे. त्यांची होणारी सतत भांडणे आणि कलाचे जबाबदारपणे वागणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात नेमके काय घडणार हे जाणून घेऊया...
कला बाजारात भाजी आणायला गेली असताना तिला वडील हमाली करताना दिसतात. ती त्यांना घेऊन घरी जाते. तसेच त्यांच्यावर ओढावलेल्या परिस्थितीची जराही कल्पना न दिल्यामुळे नाराज होते. ती वडिलांना हे आताचा आता थांबवण्यास सांगते. तसेच इथून पुढे माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवू नका असे म्हणून रडत निघून जाते.
वाचा: शाहरुखचा लेक आर्यन खान ऑरीसोबत फोटो काढताना कधीच हासत नाही, काय आहे कारण?
भाजी आणायला गेलेली कला ही बराच वेळ घरी न आल्यामुळे नैना आणि माधवी गोंधळ घालतात. तसेच सगळेजण कलाला बोलण्याची संधी साधतात. सरोज देखील कलाच दोषी असल्याचे ठरवते. तेवढ्यात कला घरी येते. तिला आल्याआल्या सर्वजण जाब विचारतात. ती उत्तर न देताच तेथून निघून खोलीत जाते. अद्वैत कलाला पुन्हा विचारतो सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरे न देताच का आली? तेव्हा कला त्याला घडलेला प्रकार सांगते. ते ऐकून अद्वैतला वाईट वाटते पण या सगळ्या परिस्थितीला तुझे आई-वडीलच दोषी आहेत असे देखील तो म्हणतो.
वाचा: आयपीएलच्या मैदान ते माधुरी दीक्षित; सर्वांनाच वेड लावणाऱ्या 'गुलाबी साडी' गाण्याचा ट्रेंड कुठून आला?
आई आणि वडिलांना मदत करण्यासाठी कला नोकरीच्या शोधात असते. पण चांदेकर नोकरी करु देणार नाही हे देखील तिला माहिती असते. शेवटी कला अद्वैतच्या कंपनीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे डिझाइन बनवण्याचा निर्णय घेते. तिने अद्वैतच्या नकळत एकदा त्याला डिल मिळवून दिलेली असते. त्यामुळे कला अद्वैतच्या ऑफिसमधील स्टाफला फोन करुन मी तुमच्यासाठी डिझाइन बनवेल आणि मला त्या बदल्यात पैसे द्या असे सांगते. तसेच याबाबत कोणालाही कळता कामा नये असे देखील म्हणते. पण अद्वैत कलाला ऑफिसमध्ये पाहातो आणि त्याला धक्का बसतो. आता अद्वैतला कलाचे सत्य कळणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. येत्या भागात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.
वाचा: दिग्दर्शकाच्या प्रेमात ते वडिलांवर फसवणूकीचा आरोप; जाणून घ्या अमिषा पटेलविषयी काही खास गोष्टी
संबंधित बातम्या