छोट्या पडद्यावरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील मुक्ता, सागर, इंद्रा, स्वाती, लकी, माधवी, मिहिका, सावनी, आदित्य, सई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. या मालिकेतील मुक्ताचा स्वभाव हा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. तिचा साधेपणा कायम प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. आता सागरची एक्स वाईफ सावनी पुन्हा त्यांच्या आयुष्यात वादळ आणत आहे. सावनी जाणून बूजून त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी एक फुलांचा गुच्छ घरी पाठवते. आता आज प्रेमाची गोष्ट मालिकेत काय घडणार? चला जाणून घेऊया...
'प्रेमाची गोष्ट' मालिकेची सुरुवात ही मिहिरने होते. मिहिकाने लग्न केल्याचे कळताच मिहिरला धक्का बसतो. तो स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतो. सागर आणि मुक्ता त्याला मदत करत असतात. सतत मिहिरच्या डोक्यात तेच तेच विचार येत असतात. त्यामुळे तो सागर त्याला बाहेर पाठवण्याचा निर्णय घेतो. कामानिमित्त मिहिरला सिंगापूरला का पाठवत आहात असा विचार मुक्ता करते. त्याला सध्या कुटुंबीयांची गरज आहे असे ती म्हणते. तेवढ्यात सावनी तेथे येते. ती मुक्ताला चांगलेच सुनावते. तसेच मिहिरला कामावर लक्ष केंद्रीत करायला सांगते. पण मिहिर ही ऑफर नाकारतो. तो इथेच राहून सत्याचा सामना करण्याचे ठरवतो.
इंद्रा आणि स्वाती पुन्हा एकदा सावनीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतात. सावनीला वांग्याची भाजी आवडत नाही. म्हणून इंद्रा सोडे आणि वांग्याची भाजी बनवते. मुक्ता स्वयंपाक घरात येते तर इंद्रा तिला आराम करायला सांगते. त्यानंतर सर्वजण जेवणासाठी येतात. सावनीला वांग्याची भाजी असल्याचे कळताच ती डाळभात खाईन असे सांगते. पण डाळ भात बनवलेला नसतो. तसेच आदित्य देखील ती भाजी खाण्यास नकार. सई त्याला कसे बसे ती भाजी खाण्यास तयार करते.
वाचा: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश
सावनी आणि सागरच्या लग्नाचा वाढदिवस असतो. त्यामुळे सावनी मुद्दाम फुलांचा गुच्छ आणि ग्रिटींग कार्ड कोळी कुटुंबाकडे पाठवते. मुक्ताला सावनीने हे केल्याचे माहिती असते. सर्वांसमोर जेव्हा हा फुलांचा गुच्छ येतो तेव्हा सर्वांना धक्का बसतो. सागरला तर प्रचंड राग येतो. तेवढ्यात आदित्य हा दिवस साजरा करण्याची मागणी करतो. मुक्ता लगेच हो म्हणते. पण सर्वांना हे मान्य नसते. आता मुक्ताने नेमका काय डाव आखवा आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मालिकेच्या आगामी भागात मुक्ता सावनीला धडा शिकवण्यासाठी काय करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.