'बाहुबली' आणि 'बाहुबली २'सारख्या उत्कृष्ट चित्रपटांनंतर आता दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आपल्या आगामी सीरिजची घोषणा केली आहे. म्हणजेच पुन्हा एकदा प्रेक्षकांना 'बाहुबली'ची नवी भेट मिळणार आहे. 'बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड' असे या आगामी वेब सीरिजचे नाव असून, दिग्दर्शक एसएस राजामौली यांनीच या सीरिजची घोषणा केली आहे. 'बाहुबली' आणि 'बाहुबली २'च्या यशानंतर या वेब सीरिजबद्दल ऐकून चाहते आता खूप खुश झाले आहेत. पुन्हा एकदा ‘बाहुबली’ परतून येतोय, असं म्हटल्यावर चाहते देखील आतुर झाले आहेत.
दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी ही अप्रतिम भेट जाहीर केली असून, या ट्रेलरची माहितीही दिली आहे. मात्र, ही ‘बाहुबली’ ही वेब सीरिज ॲनिमेटेड असणार आहे. 'बाहुबली: द क्राउन ऑफ ब्लड'च्या पोस्टरचा टीझर शेअर करताना एसएस राजमौली यांनी सांगितले की, या सीरिजचा ट्रेलर लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार असून, लवकरच प्रदर्शित होणार आहे. राजामौली यांनी इन्स्टा स्टोरी आणि ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या 'बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड' या नवीन सीरिजची पहिली झलक दाखवली आहे. दिग्दर्शकाने शेअर केलेल्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर 'बाहुबली'चे नारे देखील ऐकू येत आहेत.
'बाहुबली: द क्राउन ऑफ ब्लड'चा टीझर शेअर करत राजामौली यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जेव्हा माहिष्मतीचे लोक त्याच्या नावाचा जप करतात, तेव्हा विश्वातील कोणतीही शक्ती त्याला परत येण्यापासून रोखू शकत नाही. बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड या ॲनिमेटेड मालिकेचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे.’ अनेकांनी या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे. तर, काहींनी हा टीझर आणखी चांगला बनवता आला असता, असं म्हटलं आहे. काहींनी स्वतः बनवलेले ॲनिमेटेड हायलाइट्सही या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये दाखवले आहेत.
ॲनिमेटेड सीरिजमधील कलाकार कोण असतील किंवा या सीरिजची कथा काय असेल? याबाबत राजामौली यांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही. मात्र, व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. बहुतेक युजर्सनी लिहिले की, ते याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही सीरिज नेटफ्लिक्सवर येणार का? असे अनेकांनी विचारले आहे. एसएस राजामौली यांनी २०१५मध्ये ‘बाहुबली: द बिगिनिंग’ बनवला होता, जो ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर २०१७मध्ये प्रभासचा ‘बाहुबली २’ आला. या चित्रपटानेही भरपूर कमाई केली. आता राजामौली ‘बाहुबली’ ॲनिमेटेड सीरिजमध्ये सादर करणार आहेत.
संबंधित बातम्या