OTT Release: बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर दिसणार ‘श्रीकांत’ची जादू; कधी आणि कुठे बघता येणार चित्रपट? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Release: बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर दिसणार ‘श्रीकांत’ची जादू; कधी आणि कुठे बघता येणार चित्रपट? जाणून घ्या

OTT Release: बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर दिसणार ‘श्रीकांत’ची जादू; कधी आणि कुठे बघता येणार चित्रपट? जाणून घ्या

Jul 04, 2024 09:32 PM IST

Srikanth OTT Release: बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर ‘श्रीकांत’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर दिसणार ‘श्रीकांत’ची जादू
बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर दिसणार ‘श्रीकांत’ची जादू

Srikanth OTT Release: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री अलाया एफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘श्रीकांत’ मे महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित हा चित्रपट कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे ते जाणून घेऊया...

अभिनेता राजकुमार राव अभिनित, तुषार हिरानंदानी दिग्दर्शित 'श्रीकांत' हा चित्रपट १० मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्याचबरोबर या चित्रपटातील राजकुमार राव याचा अभिनय लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटात त्यांनी अंध उद्योगपती श्रीकांत भोला यांची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत अनेकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले. आता बॉक्स ऑफिसवर वाहवा मिळवल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. राजकुमार रावचा चित्रपट ‘श्रीकांत’ रिलीजच्या दोन महिन्यांनंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

प्रत्येक हिंदूने यावर आक्षेप घ्यावा; 'कल्की २८९८ एडी'वर संतापले मुकेश खन्ना! नेमकं काय झालं?

कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?

या चित्रपटात राजकुमार राव व्यतिरिक्त आलिया एफ, ज्योतिका आणि शरद केळकर यांसारखे अनेक स्टार्सही त्याच्यासोबत झळकले होते. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार आहे. नेटफ्लिक्सने आपल्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून ही माहिती दिली आहे. त्यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सीमांना आव्हान देणारे स्वप्न पाहा. 'श्रीकांत' ही विलक्षण सत्यकथा उद्या नेटफ्लिक्सवर येत आहे.’ म्हणजेच हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Bigg Boss OTT 3: ‘विजेता आधीच ठरलाय’; ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरातून बाहेर पडताच पौलमी दासचा शॉकिंग दावा!

चित्रपटाने किती कमाई केली?

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, राजकुमार राव स्टारर 'श्रीकांत' या चित्रपटाने ६ आठवड्यात जवळपास ५०.०५ कोटींचा व्यवसाय केला आहे.

काय होती चित्रपटाची कथा?

जन्मापासून अंध असलेला श्रीकांत आपल्या आयुष्यातले चढ-उतार कसे पार करतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. तो अभ्यासासाठी धडपडतो. विज्ञान शाखेतून अभ्यास करण्यासाठी त्याने शिक्षण विभागाविरुद्ध खटलाही दाखल केला. यानंतरही त्याच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. त्यानंतर त्याला आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला नाही. मात्र, त्याने हार मानली नाही. या सगळ्यावर मात करत त्याने यश मिळवले.

Whats_app_banner