Sridevi Birth Anniversary: श्रीदेवीला प्रपोज करण्यासाठी बोनी कपूरला करावी लागली होती ‘ही’ गोष्ट! तुम्हाला माहितीये का?-sridevi birth anniversary boney kapoor had to do this thing to propose to sridevi ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sridevi Birth Anniversary: श्रीदेवीला प्रपोज करण्यासाठी बोनी कपूरला करावी लागली होती ‘ही’ गोष्ट! तुम्हाला माहितीये का?

Sridevi Birth Anniversary: श्रीदेवीला प्रपोज करण्यासाठी बोनी कपूरला करावी लागली होती ‘ही’ गोष्ट! तुम्हाला माहितीये का?

Aug 13, 2024 08:26 AM IST

Sridevi Birth Anniversary:श्रीदेवी नेहमीच तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत होती. आज या खास दिवशी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या रंजक प्रेमकथेबद्दल जाणून घेऊया...

Sridevi Birth Anniversary 
Sridevi Birth Anniversary 

Sridevi Birth Anniversary: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिने चित्रपटसृष्टीत'चांदनी', 'सदमा', 'चालबाज', 'मिस्टर इंडिया', 'इंग्लिश विंग्लिश' असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. एक काळ असा होता की श्रीदेवी तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत असे. तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली होती. निरगस हसू आणि खोडकर स्वभाव असणाऱ्या श्रीदेवीचा आज स्मृतिदिन आहे. तिचा जन्म१३ ऑगस्ट१९६३ रोजी तामिळनाडूमध्ये झाला. श्रीदेवी नेहमीच तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत होती. आज या खास दिवशी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या रंजक प्रेमकथेबद्दल जाणून घेऊया...

प्रपोज करण्यासाठी वजन कमी केले!

श्रीदेवीचे खरे नाव श्री अम्मा यंगर अय्यपन होते. श्रीदेवीने बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती. १९७९ साली'सोलवा सावन' या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात केली.१९८३मध्ये प्रदर्शित झालेल्या'हिम्मतवाला' या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. एकदा बोनी कपूर आणि श्रीदेवी सलमान खानच्या'१० का दम' या रिॲलिटी शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. यावेळी बोनी यांनी श्रीदेवीबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यांनी सांगितले होते की, ते श्रीदेवीचा खूप मोठा चाहते देखील आहेत. एवढेच नाही तर, श्रीदेवीला प्रपोज करण्यापूर्वी बोनी कपूर यांना स्वतःचे वजन देखील कमी करावे लागले होते.

श्रीदेवीची काळजी घ्यायचे!

एकदा बोनी कपूर श्रीदेवीला भेटण्यासाठी चेन्नईतील घरी गेले होते. मात्र, त्यावेळी ती शूटिंगसाठी सिंगापूरमध्ये होती. यामुळे बोनी खूप दुःखी झाले. यानंतर ते रोज श्रीदेवीच्या बंगल्यावर येत राहिले आणित्यांनी श्रीदेवीची भेट घेतली होती. श्रीदेवीला'मिस्टर इंडिया' चित्रपटाची ऑफर देण्यासाठी बोनी कपूर चेन्नईला गेले होते. श्रीदेवीला चित्रपटाची कथा खूप आवडली आणि तिने हा चित्रपट करण्यास होकार दिला. बोनी कपूर यांनी१९८४मध्ये श्रीदेवीला'मिस्टर इंडिया'मध्ये सीमाची भूमिका ऑफर केली होती. एवढेच नाही, तर त्यांनी श्रीदेवीसाठी स्वतंत्र मेकअप रूमची व्यवस्था केली होती. श्रीदेवीच्या प्रत्येक गरजेची ते स्वतः काळजी घेत असत.

कधी केले लग्न?

श्रीदेवीच्या आईच्या आजारपणात आणि नंतर त्यांच्या मृत्यूदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली होती. आईच्या निधनानंतर श्रीदेवी खूप एकाकी पडल्या आणि त्यावेळी बोनी त्यांचा आधार बनले. येथूनच दोघांमधील प्रेम आणखीनच घट्ट झाले. यानंतर बोनी यांनी१९९३मध्ये आपल्यापेक्षा आठ वर्षांनी लहान असलेल्या श्रीदेवीला प्रपोज केले. जेव्हा बोनी श्रीदेवीच्या प्रेमात पडले होते, तेव्हा ते आधीच विवाहित होते आणि त्यांना दोन मुले होती. पण श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी त्यांनी पहिली पत्नी मोना कपूरला घटस्फोट दिला. यानंतर दोघांनी२जून१९९६रोजी लग्न केले. त्याच्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

विभाग