Squid Game 2 : 'स्क्विड गेम २'मध्ये झाली गलती से मिस्टेक! प्रेक्षकांच्या लक्षात आलं अन् मेकर्सनी लगेच पाऊल उचललं
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Squid Game 2 : 'स्क्विड गेम २'मध्ये झाली गलती से मिस्टेक! प्रेक्षकांच्या लक्षात आलं अन् मेकर्सनी लगेच पाऊल उचललं

Squid Game 2 : 'स्क्विड गेम २'मध्ये झाली गलती से मिस्टेक! प्रेक्षकांच्या लक्षात आलं अन् मेकर्सनी लगेच पाऊल उचललं

Jan 09, 2025 02:41 PM IST

Squid Game 2 Mistakes : 'स्क्विड गेम २'च्या सातव्या एपिसोडमध्ये निर्मात्यांकडून एक मोठी चूक झाली आहे. प्रेक्षकांच्या चाणाक्ष नजरेने मात्र ही चूक बरोबर हेरली आहे.

Squid Game 2 : 'स्क्विड गेम २'मध्ये झाली गलती से मिस्टेक! प्रेक्षकांच्या लक्षात आलं अन् मेकर्सनी लगेच पाऊल उचललं
Squid Game 2 : 'स्क्विड गेम २'मध्ये झाली गलती से मिस्टेक! प्रेक्षकांच्या लक्षात आलं अन् मेकर्सनी लगेच पाऊल उचललं

Fan Spotted Squid Game 2 Mistakes : जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सीरिज म्हणजे 'स्क्विड गेम'. नुकताच 'स्क्विड गेम'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या या सीरिजचा सगळीकडेच मोठा बोलबाला आहे. या दरम्यान आता सीरिजचा सातवा एपिसोड सर्वाधिक चर्चेत आहे. या एपिसोडमध्ये निर्मात्यांकडून एक मोठी चूक झाली असून, प्रेक्षकांच्या तीक्ष्ण नजरेने मात्र ही चूक सर्वांच्या लक्षात आणून दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

'स्क्विड गेम २'च्या सातव्या एपिसोडच्या व्हायरल व्हिडीओमध्ये, काही खेळाडू सैनिकांवर हल्ला करताना दिसत आहेत. खेळाडू सैनिकांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळ्या झाडताना दिसत आहेत. दरम्यान हा सीन शूट करणारा कॅमेरामॅनदेखील यात स्पष्टपणे दिसत आहे. नेटकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी हा व्हिडीओ व्हायरल करायला सुरुवात केली आहे.

'स्क्विड गेम २'मधली 'ही' चूक तुमच्या लक्षात आली का? पाहा व्हिडीओ -

'स्क्विड गेम २'मधली चूक लक्षात आणत ट्विटर युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'एपिसोडच्या मध्यभागी कॅमेरामन बॅकग्राऊंडमध्ये दिसल्यावर 'स्क्विड गेम' टीममधून एखाद्याला काढून टाकले जाऊ शकते.' तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने या व्हिडीओला 'फेक' असं म्हटलं आहे. तिसऱ्याने लिहिलं आहे की, 'या भावाला आता नक्कीच आपली नोकरी गमवावी लागेल.' तर एकाने आश्चर्याने विचारलं की, 'निर्मात्यांकडून ही चूक झालीच कशी?'

Squid Game Actor: लैंगिक शोषणाचा आरोप; 'स्किड गेम' फेम गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेता अभिनेता तुरुंगात!

सीरिजने वाढवली उत्सुकता

'स्क्विड गेम २'मधली ७ भागांमध्ये कथेत अनेक ट्विस्ट आणि टर्न येताना पाहायला मिळाले आहेत. पहिल्या सीझनप्रमाणे या भागातही ‘रेड लाईट ग्रीन लाईट’ या खेळाने हा मृत्यूचा खेळ सुरू होतो. मात्र, यावेळी खेळाडू ४५६ म्हणजेच सॉन्ग ग्यू-ह्युन या रक्तरंजित खेळापासून लोकांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. परंतु, त्याची योजना देखील अपयशी ठरते. कारण, यावेळी गेममध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. कथा जसजशी पुढे जाते, तसतसा तो स्वत: या खेळाचा एक भाग होताना दिसतो. शोच्या शेवटी, तो आपल्या टीमला आणि सगळ्या बचावलेल्या खेळाडूंना वाचवण्याचा प्रयत्न करतो.

सीरिजचं बजेट ऐकलंत का?

'स्क्विड गेम' हा पहिला सीझन २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. या सीझनने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला. जगातील सर्वाधिक पाहिलेल्या वेब सीरिजमध्ये ही सीरिज अग्रस्थानी आहे. तर, २६ डिसेंबर २०२४ रोजी या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सीरिजचं बजेट तब्बल ५ अब्ज रुपयांचं असल्याचं म्हटलं जात आहे. आता २०२५ मध्ये या सीझनचा तिसरा भाग प्रदर्शित होऊ शकतो.

Whats_app_banner