squid game season 2 Trailer Out :कोरियन वेब सीरिज ‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. या वेब सीरिजचा दुसरा सीझन २६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या शोचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज होताच त्याची जोरदार चर्चा होत आहे. चाहत्यांना ट्रेलर खूप आवडला आहे. यावेळीही शोमध्ये मृत्यूचा खेळ रंगताना पाहायला मिळणार आहे.
पैसा आणि मृत्यू याभोवती फिरणाऱ्या या वेब सीरिजमध्ये यावेळी अनेक भावभावनाही पाहायला मिळणार आहेत. बराच गदारोळ आणि धडाकेबाज अॅक्शन देखील पाहायला मिळणार आहे. यावेळीही काही जुने आणि काही नवीन गेम्सही या शोमध्ये पाहायला मिळणार आहेत. शोशी संबंधित माहिती देताना नेटफ्लिक्स इंडियाने लिहिले की, ‘आता ते या शोच्या रिलीजच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. ‘स्क्विड गेम २’ या २६ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.
या वेब सीरिज गि-हुनने ली जंग-जेची भूमिका साकारली होती. शोच्या या सीझनमध्ये तो पुन्हा एकदा पडद्यावर आणि खेळत परतताना दिसणार आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार,या नव्या आव्हानाबद्द्ल बोलताना अभिनेता म्हणाला की, ‘मी हा गेम संपवण्याचा प्रयत्न करणार आहे’. वेब सीरिजच्या गेल्या सीझनमध्ये गि-हुनने हा मृत्यूचा खेळ जिंकला होता.
या शोच्या दुसऱ्या सीझनच्या कथेबद्दल बोलताना असे सांगितले जात आहे की, यावेळी स्क्विड गेम जिंकल्यानंतर ३ वर्षांनंतर ४५६ क्रमांकाचा खेळाडू एका नवीन कल्पनेसह खेळात परतला असल्याचे दाखवले जाईल. तो पुन्हा एकदा या धोकादायक खेळात सामील होऊन खेळाला आणि स्वतःला एका नव्या उंचीवर नेईल. यावेळी जो गेम जिंकेल त्याला ४५.६अब्ज जिंकलेली बक्षीस रक्कम मिळेल. गेल्या सीझनप्रमाणे या वेळीही वेब सीरिजमध्ये जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.
या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्येही काही जुने चेहरे देखील पाहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये ली जंग-जे, ली ब्युंग-हुन, गोंग यू आणि वाई हा-जून यांच्यासोबत नवीन कलाकारांमध्ये यिम सी-वान, कांग हा-न्युल, पार्क ग्यू-यंग, पार्क सुंग-हुन, जो यू-री, यांग डोंग-गेन, कांग ए-सिम, ली डेव्हिड, ली जिन-उक, चोई सेंग-ह्यून, रोह जे-वॉनआणिवॉन जी–अनहे चेहरे‘स्क्विड गेम सीझन२’मध्ये झळकणार आहेत.