Squid Game 2 Review In Marathi : या वीकेंडला जर तुम्ही 'स्क्विड गेम सीझन २' पाहण्याचा विचार करत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. 'स्क्विड गेम' या वेब सीरिजचा पहिला सीझन २०२१मध्ये आलेला, ज्याने जगाला वेड लावले होते. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सीरिज बनली आहे. पहिला सीझन सुपरडुपर हिट झाल्यानंतर दुसऱ्या सीझनकडूनही लोकांनी तीच अपेक्षा ठेवली आहे. पण, यावेळी प्रेक्षकांना आणखी काही धक्के बसणार आहेत.
पहिल्यांदा 'स्क्विड गेम' रिलीज झाला तेव्हा ही संकल्पना पूर्णपणे नवीन होती आणि लोकांना कथेबद्दल काहीही माहिती नव्हते. पण, यावेळी कथा काहीशी तशीच असणार आहे. मात्र, यावेळी त्यात काही ट्विस्ट टाकून हा सीझन अधिक रंजक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे 'स्क्विड गेम २'मध्ये लोकांना यावेळी काही नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे. ज्यांनी या सीरिजचा पहिला सीझन पाहिला आहे, त्यांना हा दुसरा सीझन बघायला नक्कीच आवडणार आहे.
'स्क्विड गेम'च्या पहिल्या सीझनमध्ये, ४५६ खेळाडूंमध्ये अनेक प्रकारचे रक्तरंजित खेळ खेळले गेले होते आणि शेवटच्या स्थानावर असलेला खेळाडूने सर्व स्पर्धा जिंकल्या होत्या. हा स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचतो आणि विजेतेपद पटकावतो हे दाखवण्यात आले होते. मात्र, तो जिंकून इतक्यावरच थांबलेला नाही. यावेळीही तो खेळाचा भाग असणार आहे. मात्र, यावेळी त्याच्यासोबत काही नवीन चेहरे देखील दिसणार आहेत. या खेळात ४५६ क्रमांकाचा खेळाडू वगळता प्रत्येकजण नवीन आहे.
यावेळी जीवघेण्या खेळामध्ये एक आई, मुलगा, एक जोडपे आणि एक गर्भवती मुलगी आहे. या सीझनमध्ये तुमचे मन जिंकण्यात कोण यशस्वी ठरेल, हे बघण्यासारखं आहे. खेळाबद्दल बोलायचे झाले, तर या स्पर्धेत अनेक नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. काही जुनेही खेळही परत बघायला मिळणार आहेत. पण, हे खेळ नुसते कॉपी पेस्ट केले नाहीत, तर त्यातही ट्विस्ट टाकण्यात आले आहेत. कथेची संकल्पना एकच आहे. जो गेम हरेल त्याला गोळी मारली जाईल आणि शेवटी कोणीतरी एक जिंकेल. अशावेळी, वेब सीरिजच्या मागील सीझनमधील विजेता ही स्पर्धा जिंकतो की, या वेळी नवीन विजेता ठरतो, हा या कथेचा मनोरंजक ट्विस्ट आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला 'स्क्विड गेम २' पाहावा लागेल.
निर्मात्यांनी निश्चितपणे 'स्क्विड गेम'चा नवीन सीझन पहिल्या सीझनपेक्षा चांगला बनवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु कथा जुनीच असल्यासारखे वाटू शकते. पण, ज्यांनी पहिला सीझन पाहिला आहे, ते हा दुसरा सीझन पाहण्यासाठी आतुर झाले आहेत आणि त्यांची ही आतुरताही रास्त आहे. कारण, पुन्हा एकदा तोच रक्तरंजित खेळ सुरू झाला आहे, तो प्रेक्षकांना ते आवडेल अशी आशा आहे.
संबंधित बातम्या