आपल्या सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून जावे लागते. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढता येतात. असेच काहीसे खडतर प्रयत्न माधव- मिथिला करणार आहेत. त्यांची ‘ सुख कळले!’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. ही मालिका कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता मालिका अवघ्या दोन दिवसात प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आपल्याकडे प्रत्येक गोष्ट असणे म्हणजे सुख-समाधान नाही. कधीकधी दुसऱ्यांच्या सुखातही आपल्याला सुख मिळते. कधी दुसऱ्याला खुश ठेवण्यातही सुख असते. तर कधी त्यागातही सुख मिळत असते. माधव आणि मिथिलाचे सुख नेमके कशात आहे? हे सांगणारी कथा म्हणजे 'सुख कळले.' निःस्वार्थी, निर्मळ प्रेम कथा या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २२ एप्रिलपासून कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे.
वाचा: घरावर गोळीबार झाला तेव्हा अभिनेता सलमान खान नेमका कुठे होता? मोठी अपडेट आली समोर
काही दिवसांपूर्वी या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे आता प्रेक्षकांना प्रतीक्षा लागली आहे ती माधव आणि मिथिलाच्या भेटीची. या मालिकेतील माधव -मिथिला म्हणजेच सागर देशमुख आणि स्पृहा जोशीने याआधीच प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे या नवीन जोडीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असून केवळ प्रोमोवरही प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांचा आणि प्रेमाचा धुंवाधार वर्षाव होताना दिसत आहे.
वाचा: 'हे सगळं नाटक आहे', सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारावर अभिनेत्याची प्रतिक्रिया
स्पृहा व सागरच्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेत अर्नवी खडसे, सुनील गोडबोले, स्वप्निल परजणे, अनिरुद्ध जोशी, स्वाती देवल, आरती वडगबाळकर, शशांक दर्णे, स्वराध्य देवल आणि स्वाती बोवलेकरसह अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक घराला नि घरातल्या प्रत्येकाला आपली वाटणाऱ्या या मालिकेची कथा कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड आणि नाटक, मालिका, चित्रपट क्षेत्राचे आजचे आघाडीचे लेखक - दिग्दर्शक केदार शिंदे यांची असून त्या मालिकेची निर्मिती सोहम प्रॅाडक्शन्स यांनी केली आहे. तर सुचित्रा बांदेकर व सोहम बांदेकर या मालिकेचे खंदे निर्माते आहेत.
वाचा: सायली नेमकी कोणती? ओळखा पाहू व्हायरल झालेल्या फोटोमधील अभिनेत्री जुई गडकरी नेमकी कोणती?
संबंधित बातम्या