आपल्या सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून जावे लागते. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढता येतात. असेच काहीसे खडतर प्रयत्न 'सुख कळले' मालिकेतील माधव- मिथिला करत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेली ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. एका नवा पात्राची एण्ट्री झाली आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत असणाऱ्या 'सुख कळले' या लोकप्रिय मालिकेत आता रंजक वळण येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे. एकीकडे माधवच्या आकस्मिक निधनानंतर मिथिलाला म्हणजेच स्पृहाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. तर दुसरीकडे कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर घेत ती पुन्हा एकदा नोकरी करण्याचा निर्णय घेणार आहे. घर आणि नोकरी दोन्ही सांभाळणारी एक खंबीर मिथिला आपल्याला नव्याने पाहायला मिळणार आहे.
वाचा: लेकाच्या लग्नासाठी नीता अंबानी यांची खास तयारी, खरेदी केलेल्या नव्या साडीची किंमत माहिती आहे का?
'सुख कळले' मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री होत आहे. हे पात्र मिथिलाच्या खडतर प्रवासात तिची मदत करेल? की तिचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणार? हे पात्र सकारात्मक की नकारात्मक असणार असे अनेक प्रश्न रसिकांना पडले आहेत. त्यामुळे आता 'सुख कळले' मालिकेत पुढे काय होणार, याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
वाचा: 'प्रेमासाठी लढणार', ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मलायका अरोराने सोडले मौन
कोण असेल हा नवा चेहरा? कोण येणार मिथिला आणि कामेरकर कुटुंबियांच्या आयुष्यात? पण हे पात्र मनोरंजक असणार एवढं नक्की. या नव्या पात्राच्या प्रवेशाने मालिकेत एक नवी ऊर्जा आणि नवी उत्सुकता आली आहे. त्यामुळे प्रेक्षक मालिकेच्या आगामी भागाची वाट पाहात आहेत.
वाचा: मुंबईतील पॉश भागात आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का