OTT Movies : किती गूढ रहस्यांनी भरलंय आपलं अवकाश? 'या' चित्रपटांमधून पाहायला मिळेल झलक!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Movies : किती गूढ रहस्यांनी भरलंय आपलं अवकाश? 'या' चित्रपटांमधून पाहायला मिळेल झलक!

OTT Movies : किती गूढ रहस्यांनी भरलंय आपलं अवकाश? 'या' चित्रपटांमधून पाहायला मिळेल झलक!

Nov 27, 2024 04:10 PM IST

Space Movies On OTT : जर तुम्हाला अंतराळावर आधारित चित्रपट बघण्याची आवड असेल तर तुम्ही यातील काही सिनेमे जरूर पाहायलाच हवेत. यातील प्रत्येक चित्रपट थरार आणि गूढतेने भरलेला आहे.

किती गूढ रहस्यांनी भरलंय आपलं अवकाश?
किती गूढ रहस्यांनी भरलंय आपलं अवकाश?

Space Movies On OTT : अंतराळातील न सुटलेल्या रहस्यांमधून दिसणारी थराराची पातळी काय असते, हे साय-फाय चित्रपट पाहणाऱ्यांनाच ठाऊक असते. भारतापेक्षा हॉलिवूडचा भर अंतराळावर आधारित चित्रपट बनवण्यावर आहे. त्यामुळे तुम्हालाही अंतराळावर बनलेले सिनेमे बघायला आवडत असतील, तर चला जाणून घेऊया अशा काही स्पेस फिल्म्सबद्दल जे बघितले नसतील, तर तुम्ही आजच बघायला हवेत. या सिनेमांमध्ये थरार तर असतोच, पण त्याचबरोबर अंतराळाविषयीही बरंच काही शिकायला मिळतं.

द इंटरस्टेलर

ख्रिस्तोफर नोलनने २०१४ मध्ये बनवलेला 'द इंटरस्टेलर' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. अंतराळाशी संबंधित सर्व रहस्ये उलगडणाऱ्या या चित्रपटाला विविध श्रेणींमध्ये ऑस्कर मिळाला आहे. पृथ्वीवरील जीवन कधी संपुष्टात येऊ लागेल आणि आपल्याला इतर ग्रहांवर मानवी जीव कधी सापडू लागतील, याबद्दल चित्रपटाची कथा भाष्य करते.

द मून

एखादी अंतराळ मोहीम खराब झाली आणि अंतराळवीर अंतराळात अडकला तर काय होते? २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द मून’ हा चित्रपट अशीच एक कथा सांगतो. ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. या थरारक चित्रपटाची सुरुवात थोडी संथ वाटू शकते, पण नंतर तो इतका वेग पकडतो की, आपण एका सेकंदासाठीही पडद्यावरून लक्ष हटवू शकणार नाही.

अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून ७० लोकांसमोर झोपायला लावलं; प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा!

द मार्शियन

२०१५मध्ये प्रदर्शित झालेला ‘द मार्शियन’ हा चित्रपट एका अशा माणसाबद्दल आहे, जो दुसऱ्या ग्रहावर अडकला आहे. विज्ञानाचे पूर्ण ज्ञान असेल, तर दुसऱ्या ग्रहावर राहूनही जीवन कसे शक्य होऊ शकते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट बऱ्याच अंशी काल्पनिक आहे. पण, तो आपल्याला इतका रोमांचित करतो की, आपण बरेच दिवस या चित्रपटाबद्दल विचार करत राहतो.

कॅप्टन नोवा

‘कॅप्टन नोवा’ हा चित्रपट तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल. कॅप्टन नोवा आपल्याला स्पेस मूव्ही सोबतच टाइम ट्रॅव्हलची मजा देतो. चित्रपटाची कथा एका ३७ वर्षीय अंतराळवीराची आहे, जी २५ वर्षे मागे जाते आणि पृथ्वीला अत्यंत भयानक नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्याचा प्रयत्न करते.

Whats_app_banner