प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याला त्याचे वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवणे आवडते. असे असूनही, चाहत्यांनी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्याशी त्याचे नाव जोडले आहे. त्यांची केमिस्ट्री पाहून कधी सोशल मीडियाच्या पोस्टवरून, तर कधी सार्वजनिकरीत्या एकत्र पाहून हे दोन्ही स्टार्स एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तथापि, विजय किंवा रश्मिकाने या नात्याच्या अफवांना दुजोरा दिला नाही. आता विजय देवरकोंडा याने आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबुल केले आहे.
अभिनेता विजय देवरकोंडा हा त्याच्या आगामी 'द फॅमिली स्टार' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या दरम्यान, तो त्याच्या नात्याबद्दल बोलला आहे. यावेळी त्याने तो कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे देखील सांगितले आहे. विशेष म्हणजे त्याने यावेळी रश्मिका मंदानाचे नाव देखील घेतलेले नाही.
विजय देवरकोंडा याने गॅलाटा प्लसला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या रिलेशनशिप स्टेटसची पुष्टी केली आहे. एका प्रश्नादरम्यान त्याला विचारण्यात आले की, तो रिलेशनशिपमध्ये आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेता विजय देवरकोंडा म्हणाला की, 'हो'. मात्र, उत्तर देताना तो थोडा वेळ संकोचला. पण, नंतर त्याने होकार देऊन त्यांचे नाते मान्य केले.
विजय देवरकोंडा याने त्याचे रिलेशनशिप मान्य केले असेल, पण त्याने रश्मिका मंदानाचा एकदाही उल्लेख केला नाही. तो म्हणाला, 'हो, मी माझे आई-वडील आणि भावासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मी तुमच्यासोबत नात्यात आहे. आपण सगळे रिलेशनशिपमध्ये आहोत.’ विजय देवरकोंडाचे हे स्मार्ट उत्तर ऐकून काही चाहते आश्चर्यचकित झाले, तर काहीजण त्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक करत आहेत.
अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या कथित सिक्रेट रिलेशनशिपच्या बातम्या सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. प्रवासादरम्यान एकत्र असतानाही दोघेही वेगवेगळे फोटो शेअर करतात. नुकतेच रश्मिकाने सोशल मीडियावर एक ट्विट केले होते, ज्यामध्ये तिने लिहिले होते, 'माझ्या प्रिय व्यक्तीला माझ्या शुभेच्छा.' अभिनेत्रीने हे ट्विट विजय देवरकोंडा यालाही टॅग केले होते. यावर उत्तर देताना विजयने कमेंट बॉक्समध्ये 'क्यूटेस्ट' लिहिले होते. यावरून देखील चाहत्यांमध्ये कुजबुज सुरू झाली होती.