एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याकडे आज आहे ३५० कोटी रुपयांची संपत्ती
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याकडे आज आहे ३५० कोटी रुपयांची संपत्ती

एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याकडे आज आहे ३५० कोटी रुपयांची संपत्ती

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 23, 2024 10:19 AM IST

South Superstar: आज 'या' सुपरस्टार अभिनेत्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या संघर्षाविषयी, त्याच्या खासगी आयुष्याविषयी…

South Superstar
South Superstar

कलाकार हे त्यांच्या ग्लॅमरस आणि आलिशान आयुष्यासाठी विशेष ओळखले जातात. त्यांच्या कडे असलेल्या लग्झरी कार, आलिशान बंगले, महागडे कपडे याकडे नेहमीच चाहते आकर्षित होतात. पण तुम्हाला माहिती आहे का कलाकारांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नसतो. आज एका दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्याचा वाढदिवस आहे. या अभिनेत्याने एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम केले होते. पण आज याच अभिनेत्याकडे ३५० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

हा दाक्षिणात्य अभिनेता कोण? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सूर्या आहे. आज २३ जुलै रोजी सूर्याचा ४९वा वाढदिवस आहे. सूर्या तमिळ इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. उत्तम अभिनयाच्या जोरावर त्याने स्वत: ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रसिसाद मिळतो. त्याचा 'सिंघम' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता.

अभिनेता सूर्या विषयी काही खास गोष्टी

सूर्याचा जन्म २३ जुलै १९७५ साली चेन्नईमध्ये झाला. त्याचे संपूर्ण शिक्षण देखील चेन्नईमध्ये झाले. त्यानंतर सूर्याने बीकॉम जगभरात सूर्या हा अतिशय लोकप्रिय आहे. पण त्याचे खरे नाव सूर्या नाही. त्याने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी नावात बदल केला. सूर्याचे खरे नाव सर्वानन शिवकुमार असे आहे. सूर्याला अभिनयाचे बाळकडू हे घरातूनच मिळाले. सूर्याचे वडील ज्येष्ठ अभिनेते शिवकुमार आहे तर आईचे नाव लक्ष्मी.

सूर्याच्या पदार्पणाविषयी

शिक्षण घेत असताना वयाच्या २२व्या वर्षी सूर्याने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. १९९७ साली सूर्याचा पहिला तमिळ सिनेमा नेरक्कू नेर प्रदर्शित झाला. त्यानंतर २००१मध्ये सूर्याने नंदा चित्रपटात काम केले. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या गझनी या चित्रपटाने त्याला ओळख मिळवून दिली. पण जवळपास १३ वर्षांनी त्याला दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या 'रक्त चरित २' या चित्रपटाने खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटाने सूर्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. आज तो दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. तसेच तो प्रत्येक चित्रपटासाठी तो तगडे मानधन घेतो.
वाचा: अभिनेता आर. माधवन याची कमाल! व्यायामाशिवाय २१ दिवसांत कमी केलं वजन, असं काय केलं?

सूर्याच्या आयुष्यातील कठीण काळ

इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सूर्या एका कपड्याच्या कारखान्यात काम करत होता. या कंपनीमध्ये तो गारमेंट मॅनेजर म्हणून आठ महिने नोकरी करत होता. काम करत असताना त्याने शिवकुमार यांचा मुलगा असल्याचे सर्वांपासून लपवून ठेवले होते. पण कंपनीच्या मालकाला हे लगेच कळाले. पण तेव्हा इतके कष्ट करणाऱ्या सूर्याकडे आज ३५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे अनेक लग्झरी गाड्या, आलिशान बंगले आहेत.

Whats_app_banner