Prabhas Wedding: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास अडकणार विवाहबंधनात, कोण आहे ती मुलगी?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prabhas Wedding: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास अडकणार विवाहबंधनात, कोण आहे ती मुलगी?

Prabhas Wedding: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास अडकणार विवाहबंधनात, कोण आहे ती मुलगी?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 12, 2025 10:48 AM IST

Prabhas Wedding: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास लग्न कधी करणार? असा प्रश्न नेहमी सर्वांना पडतो. आता प्रभास लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Prabhas
Prabhas

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि बाहुबली फेम प्रभासने आज जगभरात आपला ठसा उमटवला आहे. प्रभासने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण प्रभासचे चाहते बऱ्याच दिवसांपासून त्याच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत. ४५ वर्षीय प्रभास हा चित्रपटसृष्टीतील बॅचलर्सपैकी एक आहे. प्रभास घोड्यावर कधी चढणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आता प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे. लवकरच अभिनेत्याच्या घरी सनई-चौघडा वाजणार आहे.

राम चरणने दिली प्रभासच्या लग्नाची माहिती

अलीकडेच अभिनेता राम चरण एनबीके सीझन 4 मध्ये त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गेम चेंजर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदमुरी बालकृष्ण यांनी केले. ग्रेट आंध्रने दिलेल्या वृत्तानुसार, एनबीके सीझन 4 चे होस्ट नंदमुरी बालकृष्ण यांच्याशी बोलताना राम चरणने प्रभासच्या लग्नाचे संकेत दिले. तो आंध्र प्रदेशातील गणपावरम येथील एका मुलीशी लग्न करणार असल्याचेही समोर आले होते. तेव्हापासून प्रभासच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत.

व्यापार विश्लेषकानेही दिली होती माहिती

व्यापार विश्लेषक मनोबाला विजय बालननेही आपल्या एक्स अकाऊंटवर अशीच पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने प्रभासचे नाव लिहिले आहे. यासोबतच एका घराच्या फोटोवर ब्राइडल इमोजी टाकून प्रभास लग्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी प्रभासची मावशी श्यामला देवी यांनीही प्रभासच्या लग्नाला दुजोरा दिला होता. लवकरच लग्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, लग्नाची तारीख आणि वधूविषयी त्यांनी अद्याप फारसा खुलासा केलेला नाही.
वाचा: लेकाचा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी आमिर खानने सोडले धूम्रपान, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या

प्रभासच्या कामाविषयी

प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच राजा साब या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रभास, रिद्धी कुमार, संजय दत्त, रिद्धी कुमार आणि मालविका मोहनन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मारुती दसारी यांनी केले आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. राजा साब हा प्रभासच्या कारकिर्दीतील पहिला हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.

Whats_app_banner