मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Annapoorani Review: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘अन्नपूर्णी’ची कथा काय आहे?

Annapoorani Review: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘अन्नपूर्णी’ची कथा काय आहे?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 11, 2024 01:11 PM IST

Nayanthara Annapoorani Review: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री नयनताराचा 'अन्नपूर्णी' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आता या चित्रपटाची कथा काय आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Annapoorani
Annapoorani

दाक्षिणात्य लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नयनताराचा 'अन्नपूर्णी' हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीपासूनच चर्चा रंगली होती. आता या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाची कथा काय आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या चित्रपटात नयनताराचा जन्म साऊथमधील एका पूजाऱ्याच्या घरी होतो. हा पूजारी सुशिक्षित आहे. मात्र, त्याला देवाची सेवा करायची असते. रोज या पूजाऱ्याच्या घरुनच देवाला नैवद्य बनवून आणला जातो. या पूजाऱ्याला मुलगी होते. तेव्हा तो तिचे नाव अन्नपूर्णी असे ठेवतो. तिला लहानपणापासून चविष्ठ पदार्थ खायचे असतात. शाळेत जायला लागल्यावर ती वेगवेगळे पदार्थ बनवून इतरांना खायला घालते. ती भारतातील प्रसिद्ध शेफ होण्याचे स्वप्न पाहाते. पण तिच्या या स्वप्नाला कुटुंबीयांचा नकार असतो. कारण तिला शेफ बनण्यासाठी मांसाहारी पदार्थ देखील बनवावे लागणार आणि ते बनवण्यासाठी त्याची चव घ्यावी लागणार.
वाचा: 'गुलाबी आँखे जो तेरी देखी', कपिल देव यांचा पत्नीसोबत रोमँटिक डान्स

अन्नपूर्णीचे वडील तिला एमबीए करण्यास सांगतात. मात्र, ती कुटुंबीयांशी खोटे बोलून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करते. एक दिवस तिचे सत्य जेव्हा कुटुंबीयांसमोर येते तेव्हा तिचे वडील तिचे नाव कॉलेजमधून काढून टाकतात. तिचे एका मुलासोबत लग्न लावून देण्याचे ठरवतात. अन्नपूर्णी मित्राच्या आणि आजीच्या वरात मंडावाच्या दारावर उभी असताना पळून जाते. त्यानंतर तिचे कुटुंबीय तिच्याशी असेलेले संबंध तोडतात. अन्नपूर्णी शहरात जाऊन एका हॉटेलमध्ये काम करु लागते आणि मास्टर शेफ स्पर्धेत त्या हॉटेला सादर करण्यासाठी जाते. त्याच रात्री अन्नपूर्णीचा मोठा अपघात होतो. या अपघातात तिला असा आजार होतो ज्यामध्ये तिच्या तोंडाची चव निघून जाते. आता अन्नपूर्ण काय करणार? हे सगळे कोणी केलेले असते? अन्नपूर्ण गावी परत जाणार का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहेत.

चित्रपटातील नयनताराचा अभिनय पाहण्यासारखा आहे. तसेच अभिनेते सत्यराज, जय, अच्युत कुमार यांचा अभिनय देखील पाहण्यासारखा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निलेश कृष्ण यांनी केले आहे. सध्या हा चित्रपटातील काही भागांवर आक्षेप घेतला जात आहे.

काय आहे वाद?

‘अन्नपूर्णी’ या चित्रपटातून भगवान रामाचा आणि हिंदू धर्माचा अपमान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या चित्रपटातील एका दृश्यात भगवान राम हे मांसाहारी असल्याचे म्हटले गेले होते. तर, अशाच एका दुसऱ्या दृश्यात हिंदू मुलगी डोक्याला कपडा बांधून नमाज पडताना दाखवून, लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सगळ्या गोंधळामुळे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन तुर्तास हटवण्यात आल्याचेही दिसत आहे.

WhatsApp channel
विभाग