Allu Arjun Arrested: हातात चहाचा कप आणि दारात आलेले पोलीस; पाहा अल्लू अर्जुनला अटक करतानाचा व्हिडीओ
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Allu Arjun Arrested: हातात चहाचा कप आणि दारात आलेले पोलीस; पाहा अल्लू अर्जुनला अटक करतानाचा व्हिडीओ

Allu Arjun Arrested: हातात चहाचा कप आणि दारात आलेले पोलीस; पाहा अल्लू अर्जुनला अटक करतानाचा व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 13, 2024 01:55 PM IST

Allu Arjun Arrested Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनला जेव्हा पोलीस अटक करण्यासाठी आले तेव्हा काय प्रतिक्रिया होती हे सांगितले आहे.

Allu Arjun Arrest
Allu Arjun Arrest

Allu Arjun Arrested Video: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा 'पुष्पा २: द रूल' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे चर्चा सुरु होती. पण आता अल्लू अर्जुनला अटक झाल्यामुळे चर्चा सुरु आहे. हैदराबाद येथील पोलिसांनी अल्लू अर्जुनला त्याच्या राहत्या घरी जाऊन अटक केली आहे. त्याचा अटक करतानाचा व्हिडीओ समोर आले आहे. या व्हिडीओमधील अल्लू अर्जुनचा स्वॅग हा पाहण्यासारखा आहे. अल्लू अर्जुनला जेव्हा अटक करण्यासाठी पोलीस घरी आले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती चला जाणून घेऊया...

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अल्लू अर्जुनच्या बंगल्यामधील आहे. हैदराबाद पोलीस ठाण्यातील काही पोलीस अल्लू अर्जुनला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी अल्लू अर्जुन हातात चहाचा कप घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. तो पोलीसांशी बोलताना चहा पित आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा हूडी आणि त्यावर पांढरी पँट घातली आहे. पोलीस अटक करण्यासाठी घरी आले असताना अल्लू अर्जुनने हातातला चहा संपावला, त्यानंतर पत्नीला मिठी मारली आणि मग पोलीसांच्या गाडीमध्ये जाऊन बसला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

साऊथमध्ये सध्या 'पुष्पा २: द रूल' हा सिनेमा चर्चेत आहे. या चित्रपटाचे शो हे हाऊसफूल होताना दिसत आहे. हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी एका थिएटरमध्ये एक दिवस आधी या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. तसेच चाहत्यांना सरप्राइज देण्यासाठी अल्लू अर्जुन स्वत: या थिएटरबाहेर आला होता. त्याच्या आगमनामुळे तिथे असलेल्या चाहत्यांमध्ये प्रचंड गदारोळ माजला आणि चेंगराचेंगरी परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण या गोंधळता एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच तिचा छोटा मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणात अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्लू अर्जुनला शुक्रवारी चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतले.
वाचा: दोन तासांचा सिनेमा सव्वा मिनिटांत सांगितला! ‘पुष्पा २’ची चिरफाड करणारा हा व्हिडिओ पाहाच!

'पुष्पा २: द रूल' सिनेमाविषयी

अल्लू अर्जुन-रश्मिका मंदाना स्टारर पुष्पा २ : द रूल हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याच्या कलेक्शनने अनेक विक्रम मोडले आहेत. हा अॅक्शन थ्रिलर २०२१ मधील ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा : द राइजचा सिक्वल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद यांच्याशिवाय बाबू, धनंजय, राव रमेश, सुनील आणि अनसूया भारद्वाज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 

Whats_app_banner