Mohanlal Admitted To Hospital : सुपरस्टार मोहनलाल हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. मोहनलाल आपल्या हिट चित्रपटांसाठी ओळखले जातात. दरम्यान, आता मोहनलाल यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहनलाल यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यासोबतच त्यांना ताप आला असून स्नायू दुखण्याची समस्या सुरु झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने कोचीयेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बातमीमुळे अभिनेत्याचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. सर्वजण मोहनलाल लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
खरं तर, मोहनलाल यांनी तीव्र तापानंतर श्वास घेण्यास त्रास आणि स्नायू दुखण्याची तक्रार केली होती. यानंतर त्यांना कोचीयेथील रुग्णालयात दाखल करावे लागले. अधिकृत वैद्यकीय अहवालानुसार, त्यांना व्हायरल रेस्पिरेटरी इन्फेक्शन होते. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असून स्नायू दुखत आहेत. डॉक्टरांनी मोहनलाल यांना पाच दिवस सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला आहे. मोहनलाल यांच्या तब्येतीबाबत अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने सांगितले की, 'अभिनेता तीव्र ताप आणि श्वासोच्छवासाच्या समस्येतून हळूहळू बरा होत आहे.'
इंडस्ट्रीट्रॅकर श्रीधर पिल्लई यांनी सोशल मीडियावर मोहनलाल यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अधिकृत स्टेटमेंटही शेअर केले आहे. सध्या सगळीकडे मोहनलला यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे की नाही याविषयी चर्चा सुरु आहे. मोहनलाल लवकर बरे होती असा विश्वास डॉक्टरांनी दाखवला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये थोडे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मोहनलालच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी नुकताच त्यांच्या आगामी 'एल २ : एम्पूरन' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. याशिवाय ते लवकरच त्याच्या आगामी 'बारोगेस' या चित्रपटात दिसणार आहे. मोहनलाल या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शकही मोहनलाल आहेत. यावर्षी २ ऑक्टोबरला 'बरोस' मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आता मोहनलाल यांची प्रकृती खालावल्यामुळे चाहते ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत