बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक काळ असा होता जेव्हा गायक किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि मुकेश यांचा दबदबा होता. या तीनही गायकांनी त्यांच्या सुमधून आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. याच काळात दाक्षिणात्य गायक येसुदास यांची बॉलिवूडमध्ये एण्ट्री झाली. त्यांनी काही मोजकीच वर्षे बॉलिवूडमध्ये काम केले. पण त्या काळात त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली. त्यांची गाणी आजही चाहते आनंदाने गाताना दिसतात.
येसुदास यांचा जन्म १० जानेवारी १९४० रोजी केरळमध्ये झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध अभिनेते आणि म्यूजिशियन होते. येसुदास यांनी त्यांच्या वडिलांचे मित्र कुंजन वेलु भागवथार यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. त्यानंतर त्यांनी स्वाती थिरुनम कॉलेज ऑफ म्यूझिकमधून प्रोफेशनल ट्रेनिंग घेतली. पण पैशांची कमतरता भासू लागल्यामुळे त्यांनी ट्रेनिंग अर्धवट सोडली. त्यानंतर त्यांनी वेच्चोर हरिहरा सुब्रमणिया अय्यर आणि चॅमबाई वैद्यनाथ भगावतार यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले.
वाचा: माधुरीचा 'पंचक' हिट की सुपरफ्लॉप? वाचा बॉक्स ऑफिस कलेक्सशन
येसुदास यांनी १९६१ साली करिअरला सुरुवात केली. जाथी बेधाम माथा द्वेशाम नावाच्या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांनी एका मुलाखतीमध्ये या गाण्याला करिअरमधील महत्त्वाचे गाणे असल्याचे म्हटले. त्यानंतर त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये जवळपास एक दशक पर्यंत काम केले. याच काळात त्यांनी पी लाल, एस जानकी आणि के पी उदयभानू यांच्यासोबत काम केले.
येसुदास यांनी करिअरमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली. चांद अकेला, कोई गाता मैं सो जाता, माना हो तुम बेहद हसीं, तू जो मेरे सुर में सुर मिला ले, कहां से आए बदरा, जानेमन जानेमन आणि सुरमाई अंखियों में अशी अनेक गाणी त्यांनी गायली. आता त्यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त इंडस्ट्रीमधील जवळपास ६३ गायक एकत्र आले आहेत. त्यांनी येसुदास यांना शुभेच्छा देण्यासाठी आगळावेगळा निर्णय घेतला आहे. हे सगळे गायक मिळून येसुदास यांना गाण्याच्या माध्यमातून शुभेच्छा देणार आहेत.
संबंधित बातम्या