- १२ मे रोजी गुरुवारीच सहानाने आपला २२ वा वाढदिवस साजरा केला होता. मात्र हा वाढदिवसच तिचा शेवटचा वाढदिवस ठरला. वाढदिवसाला रात्रीच तिच्या मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबाच्या कानावर पडली.
दाक्षिणात्या मॉडल आणि अभिनेत्री सहाना गुरुवारी रात्री मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी सांगितले की, मळयालम अभिनेत्रीच्या मृत्यूचे गूढ बनले आहे. रिपोर्टनुसार सहाना घरातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी अभिनेत्रीचा पती सज्जाद याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मृत्यूच्या दिवशीच सहानाचा २२ वा वाढदिवस होता. मुलीच्या अकस्मात मृत्यूने तिच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे. सहानाच्या आईने आरोप केला आहे की, सहानाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
१२ मे रोजी गुरुवारीच सहानाने आपला २२ वा वाढदिवस साजरा केला होता. मात्र हा वाढदिवसच तिचा शेवटचा वाढदिवस ठरला. वाढदिवसाला रात्रीच तिच्या मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबाच्या कानावर पडली. वाढदिवशीच तरुण अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केल्याचं तिच्या नवऱ्याने म्हटलं आहे. तर नवऱ्यानेच तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.
केरळमधील मॉडेल आणि अभिनेत्री सहानाचा मृतदेह तिच्या बाथरुममध्ये सापडला आहे. १२ मे रोजी तिचा २१ वाढदिवस झाला. त्यानंतर १३ मे रोजी रात्री १ वाजता तिच्या कुटुंबाला तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. तिचं कुटुंब कासारगोड जिल्ह्यात राहते.
पोलिसांनी सांगितले की, सज्जाद आधी कतारमध्ये कामाला होता. मात्र सध्या तो बेरोजगार आहे. शहानाने नुकतेच एका चित्रपटात काम केले आहे. म्हटले जात आहे की, सहानाला चित्रपटसृष्टीतून मिळणाऱ्या पैशावरून पती-पतीमध्ये वाद होता. सहानाने अनेक जाहिरातींमधूनही काम केले आहे. सहानाने दीड वर्षापूर्वीच सज्जादशी लग्न केले होते.