दाक्षिणात्य अभिनेत्री सदा सय्यद ही कायमच चर्चेत असते. तिने मल्याळम, तेलुगु, तमिळ आणि कन्नड या चारही भाषांमध्ये काम केले आहे. सदाने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. सदाही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिने नुकताच ताडोबा अभयारण्यात फिरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिला जंगल सफारी दरम्यान वाघ दिसले आहेत.
सदाने तिच्या अधिृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ताडोबा अभयारण्यात जंगल सफारी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला सदा ही कानटोपी, स्वेटर घालून जंगल सफारीसाठी निघाली असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये पुढे तिला अभयारण्यातील काही वाघ दिसत आहेत. एक वाघिण तिचे तीन बछडे घेऊन रस्त्यावर चालताना दिसत आहे. तसेच अभयारण्यातील वेगवेगळ्या भागातील वाघांच्या हालचाली तिने कॅमेरामध्ये कैद केल्या आहेत. सदाचा हा जंगल सफाराची व्हिडीओ पाहण्यासारखा आहे.
सदाने व्हिडीओ शेअर करत तिचा अनुभव सांगितला आहे. 'तुम्ही किती मोजू शकता? यावेळी, नशिबाने मला अशा प्रकारे साथ दिली ज्याची मला कधीही अपेक्षा नव्हती. डिसेंबर २०२४मध्ये मी ताडोबा अभायरण्यात जंगल सफारीसाठी गेले होते. ही जंगल सफारी माझ्यासाठी आतापर्यंतची सर्वोत्तम होती. मी १२ जंगल सफारी केल्या. त्यामध्ये १९ वाघ पाहिले. पहिल्या दोन सफारींमध्ये मला एकही वाघ दिसला नाही. त्यामुळे माझी उत्सुकता कमी होऊ लागली होती. पण नंतरच्या जंगल सफारीमध्ये मला अनेक वाघल दिसले. ते पाहणे माझ्यासाठी अविस्मरणीय होते' या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.
पुढे सदाने कॅप्शनमध्ये व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या वाघांची नावे सांगितली आहेत आणि ती खालील प्रमाणे आहेत-
१. Y चिन्ह, मायाचा मुलगा, आगरझारी बफर
२. मामा, कोलारा कोर
३. छोटा दडियाल, मोहर्ली कोर
४. कॉलरवाली आणि तीन बछडे, मोहर्ली कोर
५. के मार्क बछडा, केसलाघाट बफर
६. कुवनी बछडा, पांगडी बफर
७. बबली, नवेगाव गाभा
८. छोटी मधु आणि ३ बछडे, देवडा बफर
वाचा: चारित्र्यावर संशय घेण्याच्या रविंद्र महाजनी यांच्या स्वभावामुळे पत्नीने नोकरी करणे टाळले
सदाने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील वाघ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने तर, ‘तुमच्या सारखे चांगले नशीब कोणाचेही नाही’ अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने, ‘उत्कृष्ट’ असे म्हटले आहे.
संबंधित बातम्या