फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकत 'ही' अभिनेत्री बनली आयएएस अधिकारी, सहा वेळा दिली यूपीएससीची परिक्षा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकत 'ही' अभिनेत्री बनली आयएएस अधिकारी, सहा वेळा दिली यूपीएससीची परिक्षा

फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकत 'ही' अभिनेत्री बनली आयएएस अधिकारी, सहा वेळा दिली यूपीएससीची परिक्षा

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 27, 2024 03:21 PM IST

आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जिने आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. या अभिनेत्रीने जवळपास सहा वेळा यूपीएससीची परीक्षा दिली.

HS Keerthana
HS Keerthana

चित्रपट सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारणाऱ्या अभिनेत्रींबद्दल तुम्ही बरंच काही ऐकलं असेल, पण हे झगमगाटाची दुनिया सोडून आयएएस बनलेल्या अभिनेत्रीबद्दल तुम्ही ऐकलं आहे का? नाही! आज आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जिने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. या अभिनेत्रीने २०२०मध्ये यूपीएससी सीएसई परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

कोण आहे ही अभिनेत्री?

एच. एस. कीर्तन असे या अभिनेत्रीचे नाव आहे. एस. एस. कीर्तन यांनी 'कर्पूरदा गोंबे', 'गंगा-यमुना', 'मुदिना आलिया', 'सर्कल इन्स्पेक्टर', 'ओ मल्लिगे', 'लेडी कमिशनर', 'हब्बा', 'डोरे', 'सिम्हाद्री' अशा अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. तिने प्रसिद्धीही मिळवली, पण तिची स्वप्ने फार मोठी अभिनेत्री बनण्याची नव्हती तर आयएएस अधिकारी होण्याची होती. त्यामुळे या अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकून यूपीएससीची तयारी सुरू केली.

सात वर्षे घेतली मेहनत

सात वर्षांच्या मेहनतीनंतर आयएएस अधिकारी होण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. २०११ मध्ये तिने पहिल्यांदा कर्नाटक प्रशासकीय सेवा परीक्षा दिली. या परीक्षेत तिला चांगले गुण मिळाले आणि ती केएएस अधिकारी बनली. केएएस अधिकारी झाल्यानंतरही तिने आयएएस होण्याचे स्वप्न सोडले नाही. तिने आपला अभ्यास सुरू ठेवला आणि २०१३ मध्ये प्रथमच यूपीएससी सीएसई परीक्षा दिली. मात्र, तिला या परिक्षेत यश मिळाले नाही.
वाचा: मुलीच्या मृत्यूने खचल्या होत्या अनुराधा पौडवाल, स्वप्नात झाला कालीमातेचा साक्षात्कार आणि...

२०२०मध्ये मिळाले यश

या अभिनेत्री सलग सात वर्षे मेहनत घेतली, वारंवार यूपीएससी सीएसई परीक्षा दिली आणि सहाव्या प्रयत्नात यश मिळवले. यूपीएससी सीएसई २०२० मध्ये त्याने 167 चा ऑल इंडिया रँक (एआयआर) मिळवला आणि आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. या अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा रंगली होती.

Whats_app_banner