दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून वाईट बातमी समोर आली आहे. 'डायरेक्टर्स स्पेशल', 'एडेलू मंजुनाथ' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या कन्नड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. त्यांच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता गुरुप्रसाद यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
रविवारी ३ नोव्हेंबर रोजी बंगळुरु येथील राहत्या घरात दिग्दर्शकाने स्वत:चे आयुष्य संपवले आहे. गुरुप्रसाद यांच्या शेजारी राहात असलेल्या कुटुंबाने घरातून दुर्गंध येत असल्याचे पोलिसांना कळवले . त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुरुप्रसाद यांच्या घराचा दरवाजा तोडला . त्यानंतर त्यांना समोर पंख्याला लटकलेल्या अवस्थेत गुरुप्रसाद यांचा मृतदेह सापडला . पैशांची तंगी असल्यामुळे गुरुप्रसाद यांनी हे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे.
गुरुप्रसाद यांच्या निधनाची माहिती बंगळुरु ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माता गुरुप्रसाद त्यांच्या चित्रपटाच्या कोणत्यातरी गोष्टीला घेऊन अस्वस्थ होते. गेल्या अनेक दिवसांपासून तणावाखाली असणाऱ्या या दिग्दर्शकांन चार-पाच दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. बेंगळुरूच्या अपार्टमेंट मध्ये रविवारी सायंकाळी सडलेल्या अवस्थेत या दिग्दर्शकाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे .'
एसीपी सी के बाबा यांनी देखील गुरुप्रसाद यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, गुरुप्रसाद हे गेले पाच-सहा दिवस शेजारच्यांना दिसले नाही अशी माहिती शेजारच्यांनी दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार , दिग्दर्शक गुरुप्रसाद हे गेल्या अनेक दिवसांपासून पैशांच्या तंगीमुळे तणावाखाली होते. त्यांच्या अचानक जाण्याने दक्षिण भारतीय मनोरंजनसृष्टीसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे . ५ ते ६ दिवसांपूर्वीच दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी गळफास घेऊन स्वत:चे आयुष्य संपवले आहे.
वाचा: 'दृष्ट लागण्या जोगे सारे' गाण्यातील अभिनेत्रीला खरोखरच लागली दृष्ट? अगदी कमी वयात घेतला जगाचा निरोप
दिग्दर्श क गुरुप्रसाद यांनी आजवर काही मोजक्याच चित्रपटांसाठी काम केले आहे. त्यांनी कन्नड इंडस्ट्रीमध्ये दिलेले सिनेमे हे प्रेक्षकांना विशेष आवडले होते . २००६ साली त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले . त्यानंतर त्यांना आजवर अनेक पुरस्कार आणि नामांकने मिळाली आहेत.