Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
May 17, 2024 12:16 PM IST

Cinema Hall Shut Down : चित्रपटगृह अचानक दहा दिवस का बंद ठेवण्यात येत आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया काय आहे नेमके कारण...

दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद
दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद

कलाविश्वाशी संबंधीत एक मोठी बातमी समोर आली आहे. आज पासून पुढचे दिवस चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्रात किंवा बॉलिवूड इंडस्ट्रीने घेतलेला नसून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये घेण्यात आला आहे. २०२४ हे वर्ष दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी अतिशय चांगले ठरले आहे. अनेक बड्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले असून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरताना दिसले. पण आता अचानक दक्षिणेकडे पुढचे दहा दिवस चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामागे नेमके काय आहे कारण हे जाणून घेऊया...

काय आहे प्रकरण?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये वर्षाच्या सुरुवातीपासूनच काही हिट चित्रपट प्रदर्शित झाले. ‘हनुमान’ आणि ‘टिल्लू स्क्वेअर’ या चित्रपटांनी तर तुफान कमाई केली आहे. पण हे सिनेमे सोडले तर इतर चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही. आताचे गेले दोन ते तीन महिने तमिळ फिल्म इंडस्ट्रीसाठी फार काही चांगले गेले नाहीत. त्यामध्ये आता लोकसभा निवडणुक आणि आयपीएल चालू असल्याने त्याचा बसत असलेला फटकाही जाणवू लागला आहे. कारण अनेक चांगले चित्रपट असतानाही प्रेक्षकांचा हवा तसा काही प्रतिसाद मिळाला नाही.
वाचा: बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची जेमतेम कमाई, सहाव्या दिवशी फक्त इतकी कमाई

सध्या चित्रपटांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. त्यामुळे तेलंगणामधील सिंगल स्क्रिन थिएटर्स मालकांनी येत्या दहा दिवसात थिएटर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणात १७ मे पासून १० दिवस सिनेमा हॉल बंद राहणार आहेत. प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रुल’सह अनेक नवीन बिग बजेट चित्रपट येत्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत. प्रत्यक्षात चित्रपटांच्या कमतरतेमुळे चित्रपटगृहे चालवण्यात चित्रपटगृह मालकांना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.
वाचा: गौरव मोरेच्या 'मॅड' अदांवर बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत फिदा! पाहा रोमँटिक व्हिडीओ

येत्या काळात कोणते चित्रपट प्रदर्शित होणार?

सुधीर बाबूचा ‘हरोम हरा’, सत्यभामा, ‘लव्ह मी’, ‘गँग्स ऑफ गोदावरी’ हे बहुचर्चित चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द रुल’ पासून ते प्रभासच्या ‘कल्की 2898AD’ पर्यंत आणि रामचरण व ज्युनियर एनटीआरचे चित्रपटही येणार आहेत.
वाचा: 'हे नाटक नाही, राखीची प्रकृती अतिशय गंभीर आहे', अत्यंत जवळच्या व्यक्तीने दिली माहिती

Whats_app_banner