
Samantha Ruth Prabhu New Look: साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने सध्या मनोरंजन विश्वातून मोठा ब्रेक घेतला आहे. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री चित्रपट जगतापासून काही काळ दूर जात असली तरी ती सोशल मीडियावर मात्र आता चांगलीच सक्रिय झाली आहे. समंथा आपले फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. आता अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने तिच्या बदललेल्या लूकची एक झलक शेअर केली आहे. समंथा रुथ प्रभूने २३ जुलै २०२३ रोजी इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा बदललेला लूक दिसला आहे.
या लूकमध्ये समंथा रुथ प्रभू हिने तिचे केस लहान केले आहेत. नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर गोड हसू लेवून तिने आपली जबरदस्त स्टाईल दाखवली आहे. हिरव्या रंगाच्या ब्रालेट टॉपमध्ये समंथा खूपच सुंदर दिसत आहे. ही व्हिडीओ क्लिप शेअर करताना समंथाने हार्ट इमोजी शेअर केला आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच समंथाच्या या नव्या लूकचे खूप कौतुक केले आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. समंथाच्या या लूकवर कमेंट करत अभिनेत्री हंसिका मोटवानीने लिहिले की, 'नेहमीप्रमाणेच सुंदर.' समंथाचा हा लूक पाहून चाहते तिला 'इंडियन बार्बी' म्हणत आहेत. अनेक लोक सुंदर, जबरदस्त आणि सुंदर अशा कमेंट करून तिची प्रशंसा करत आहेत.
मनोरंजन विश्वातून ब्रेक घेऊन समंथा आता काही वेळ स्वतःला देत आहे. या दरम्यान ती शांती, ध्यानधारणा करत आहे. काही काळापूर्वी समंथाने सद्गुरूच्या ईशा फाऊंडेशनमधून तिचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती सामान्य लोकांसोबत बसून ध्यानधारणा करताना दिसली आहे. अशाप्रकारे ध्यानधारणा करताना तिला सुरुवातीला खूप त्रास झाला. पण, नंतर तिला या सगळ्यातून खूप शांतता मिळाली, असे तिने म्हटले आहे.
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या मायोसिटिस नावाच्या आजाराने त्रस्त आहेत. गेल्या वर्षीच अभिनेत्रीला या आजाराचे निदान झाले होते आणि तिने त्या दरम्यान काही काळ विश्रांती घेतली होती. आता पुन्हा एकदा समंथाने इंडस्ट्रीतून ब्रेक घेऊन या आजारावर उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती जवळपास एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे.
संबंधित बातम्या
