मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अरुंधतीची प्रकृती गंभीर, कुटुंबीयांनी चाहत्यांकडे केली मदतीची मागणी

अरुंधतीची प्रकृती गंभीर, कुटुंबीयांनी चाहत्यांकडे केली मदतीची मागणी

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 20, 2024 07:51 PM IST

लोकप्रिय अभिनेत्री अरुंधतीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला आहे. या अपघातानंतर ती व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने दिली होती. आता कुटुंबीयांनी चाहत्यांकडे मदत मागितली आहे.

अरुंधतीची प्रकृती गंभीर, कुटुंबीयांनी चाहत्यांकडे केली मदतीची मागणी
अरुंधतीची प्रकृती गंभीर, कुटुंबीयांनी चाहत्यांकडे केली मदतीची मागणी

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री अरुंधती नायरचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अरुंधती गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून ती मृत्यूशी झुंज देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अरुंधतीच्या मैत्रिणीने अपघाताची माहिती चाहत्यांनी दिली होती. त्यानंतर तिच्या बहिणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना अरुंधतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. आता अरुंधतीची प्रकृती आणखी खालावल्याची माहिती समोर आली आहे.

अरुंधतीची बहिण अरथी नायरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने बहिणीच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. अरथीने "तामिळनाडूतील वर्तमानपत्रांत आणि वृत्त वाहिन्यांमध्ये येत असलेल्या बातम्यांवर मला स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. माझ्या बहिणीचा तीन दिवसांपूर्वी अपघात झाला. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली असून तिरुंवनंतपुरम येथील अनंतपुरी रुग्णालयात तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे" अशी माहिती दिली आहे.
वाचा: फायटर ते ऐ वतन मेरे वतन; 'या' आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका

अरुंधतीची प्रकृती सध्या चिंतानजक आहे. त्यामुळे बहिणीने चाहत्यांना आवाहन केले आहे की तिच्या प्रकृतीसाठी देवाकडे प्रार्थना करावी. तसेच अरुंधीतीच्या बहिणीने आर्थिक मदतीसाठी देखील चाहत्यांना आवाहन केले आहे. आता अरुंधतीच्या प्रकृतीबाबात पुढची अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते वाट पाहात आहेत.
वाचा: ऐश्वर्या देणार चाहत्यांना गुडन्यूज? प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण

अरुंधतीच्या कामाविषयी

अरुंधती नायर ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने २०१४मध्ये करिअरला सुरुवात केली. 'पोंगी एझु मनोहरा' हा तिचा पहिला चित्रपट ठरला आहे. त्यानंतर तिने २०१८मध्ये तमिळ इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले. 'ओट्टाकोरु कामुकन' हा तिचा पहिला तमिळ चित्रपट ठरला. त्यानंतर अरुंधतीने २०१९- २०२० साली छोट्या पडद्यावर पदर्पण केले. तिने काही मालिकांमध्ये काम केले. तिने २०२३ साली प्रदर्शित झालेल्या 'आयिरम पोरकासुकल' या तमिळ चित्रपटात शेवटचे काम केले. अरुंधतीला २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'शैतान' या चित्रपटाने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते. आता अरुंधतीची प्रकृती सुधारावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग