दाक्षिणात्य कलाकार हे सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. ते चाहत्यांशी देखील तितकेच जोडलेले असतात. सध्या सोशल मीडियावर एका दाक्षिणात्य अभिनेत्याचे कौतुक होत आहे. त्याने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला मारणाऱ्या युवकाला चांगलाच धडा शिकवला आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होणारा हा अभिनेता दुसरातिसरा कोणी नसून नाग शौर्य आहे. एक व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेंडला भर रस्त्यात मारहाण करत असताना नाग शौर्यने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये नाग शौर्य त्या व्यक्तीशी बोलताना दिसत आहे. इतकच नव्हे तर तो व्यक्ती तिथून जाऊ लागला तेव्हा नाग शौर्यने त्याचा हात धरून त्याला थांबवतो आणि मारहाण थांबवण्यास सांगतो.
वाचा: मॅगझिनवरील टॉपलेस फोटोमुळे वर्षा उसगांवकरांनी माजवली होती खळबळ!
व्हिडीओमध्ये नाग शौर्य रागात बोलताना दिसत आहे की, “तू तिला रस्त्यावर का मारलंस? ती तुझी गर्लफ्रेंड असू शकते, पण त्यामुळे तू तिच्यासोबत वाटेल तसा वागू शकत नाही. तिची माफी माग.” हा व्हिडीओ मंगळवारी हैदराबादमध्ये शूट करण्यात आला होता. ही घटना भर रस्त्यात घडत होती आणि आजूबाजूने गाड्या धावत होत्या. महिलेला मारहाण करताना पाहून नाग शौर्यने त्याची कार थांबवली होती. त्यानंतर बाहेर येत त्याने मारहाण करणाऱ्या तरुणाला धडा शिकवला होता.
कोण आहे नाग शौर्य?
नाग शौर्य एक उत्तम अभिनेता आहे. त्याने २०११मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रिकेट, गर्ल्स अँड बीअर’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्याच्या ‘चंदामामा कथलू’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘ओ बेबी’ या चित्रपटात त्याने समंथा रुथ प्रभूसोबत स्क्रीन शेअर केली आहे. तो एक निर्माता देखील आहे.
संबंधित बातम्या