Allu Arjun: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला पुष्पा २ चित्रपटाच्या प्रीमिरला झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आली होती. काही वेळा पूर्वी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता अटकेनंतर अल्लू अर्जुनचा जामीन मंजुर झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनचे चाहते आनंद व्यक्त करताना दिसत आहे.
अभिनेता अल्लू अर्जुनला राहत्या घरातून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला मेडिकल स्टेस्टसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वसामान्य आरोपीप्रमाणे अल्लू अर्जुन हैदाराबादच्या रुग्णालयात चाचण्या करताना दिसला. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. अल्लू अर्जुनला पाहून त्यावेळीही चाहत्यांनी आरडाओरड सुरू केली. दरम्यान, अल्लू अर्जुनला या प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. त्यानंतर काही तासांमध्येच अल्लू अर्जुनचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अल्लू अर्जुनने 'पुष्पा २: द रूल' या चित्रपटाच्या प्रिमिअरला हजेरी लावणार असल्याची माहिती न दिल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संध्या थिएटरवर सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने मृत महिला आणि तिच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत २५ लाख रुपयांची मदत केली. पण तरीही त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
'पुष्पा २: द रूल' या चित्रपटाचे शो हे हाऊसफूल होताना दिसत आहे. हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये एक दिवस आधी या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. तसेच चाहत्यांना सरप्राइज देण्यासाठी अल्लू अर्जुन स्वत: या थिएटरबाहेर आला होता. त्याच्या आगमनामुळे तिथे असलेल्या चाहत्यांमध्ये प्रचंड गदारोळ माजला आणि चेंगराचेंगरी परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळता एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच तिचा छोटा मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणात अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
वाचा: अभिनेत्री नग्न अवस्थेत व्ही. शांताराम यांच्यासमोर उभी राहिली आणि मग...
पुष्पा २ : द रूल हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद यांच्याशिवाय बाबू, धनंजय, राव रमेश, सुनील आणि अनसूया भारद्वाज यांच्या भूमिका आहेत.
संबंधित बातम्या