CID: टेलिव्हिजनचा आवडता क्राइम बेस्ड शो सीआयडी हा नेहमीच प्रेक्षकांचा आवडता शो राहिला आहे. टीव्हीवर या मालिकेचा बराच काळ दबदबा होता. अनेकांनी मालिकेतील दया प्रमाणे दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला होता. सीआयडी मालिका पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुन्हा एकदा सीआयडी मालिका टीव्हीवर धडक देणार आहे. अशातच सीआयडीची पहिली झलक रिलीज झाली आहे, त्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तसेच प्रोमोच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
टीव्हीचा प्रसिद्ध शो सीआयडी तब्बल सहा वर्षानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो आता पूर्वीपेक्षा जास्त जबरदस्त असणार आहे. यावेळीही तुम्हाला शोमध्ये अनेक जुने चेहरे पाहायला मिळणार आहेत. अशातच आता सीआयडीची पहिली झलक समोर आली आहे, जी इंटरनेटवर व्हायरल झाली आहे.
प्रोमोची सुरुवात सीआयडी की जान म्हणजेच एसीपी प्रद्युम्न (शिवाजी साटम) पासून होते. तो अतिशय आकर्षक लूकमध्ये दिसत आहे. त्याचवेळी इन्स्पेक्टर दया देखील दिसत आहेत. यासोबतच प्रोमोच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. सीआयडीचा प्रोमो २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या शोच्या झलकीमुळे लोकांचा उत्साह वाढला आहे.
वाचा: एका क्रिकेट मॅचमुळे गेला 'या' मराठमोळ्या अभिनेत्याचा जीव, वाचा नेमकं काय झालं
रिआयडी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे कळताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रोमोमुळे जुन्या मालिकेच्या आठवणी प्रेक्षकांमध्ये ताज्या झाल्या आहेत. यावर युजर्स कमेंट करत आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली की, 'हा शो पुन्हा येईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती.' दुसऱ्या एका यूजरने, 'लहानपणीच्या जुन्या आठवणी ताज्या होतील' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने "वाह, आम्ही या शोची वाट पाहत होतो" अशी कमेंट केली आहे.