९० चं दशक म्हणजे मंतरलेला काळ होता. नव्वदीचे दशक फॅशन, सौंदर्य, टेलिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण संक्रमणाचा कालखंड होता. अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत होते. आजही त्या आठवणी अनेकांसाठी ताज्या आहेत. नव्वदीच्या दशकातील हा काळ ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून आपल्याला अनुभवायला मिळत आहे. या मालिकेत सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. आता ही मालिका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे.
'तू भेटशी नव्याने' ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. प्रेक्षकांनी मालिकेवर खूप प्रेम केले. अभिमन्यू सर आणि गौरी यांच्यातील विशेष अशी नोकझोक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. माही आणि तन्वी यांची प्रेमकथा हे विशेष लक्ष वेधून घेते आहे. मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. अभिमन्यू सर आणि गौरी यांचं लग्न पार पडणार आहे. वयाचं अंतर दूर सारून अभिमन्यू आणि गौरी यांचं लग्न होणार आहे. अभिमन्यू आणि गौरी यांची मनं लग्नानंतर जुळतील का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मालिका रंजक वळणावर आली असून मालिकेत गौरीचं लग्न ठरलं आहे, पण ते राघवसोबत. गौरीच्या घरी लग्नाची तयारी धुमधडाक्यात सुरू आहे. पण राघवचा नक्की बेत काय आहे, आहे, हे अद्याप उघडकीस आलं नाही. मात्र अभिमन्यूला हे कळणार का, आणि तो गौरीला या जाळ्यातून कसा बाहेर काढणार का, हे या लग्नसोहळ्यातून आपल्याला पाहायला मिळेल. अभिमन्यू हा पूर्वीपासूनच तन्वीच्या प्रेमात आहे, हे आपल्याला पाहायला मिळते आहेच. पण तिच्यासारख्याच दिसणाऱ्या गौरीसोबत तो विवाहबंधनात कसा अडकणार, हे आता मालिकेत पाहता येईल.
अभिमन्यू आणि गौरी यांची जोडी लग्न कसं करणार, हे पाहण्यासाठी आपल्याला 'तू भेटशी नव्याने' ही मालिका पाहावी लागेल. गौरी आणि अभिमन्यू यांच्या लग्नावर रागिणीची प्रतिक्रिया कशी असेल, हे पाहणे मजेशीर असणार आहे, कारण तिचे अभिमन्यूवर असलेले प्रेम आणि गौरीच तिरस्कार. या गोष्टींत आणखीन रंगात येणार आहे. ऐन चाळिशीत असलेले अभिमन्यू सर आणि त्यांच्या कॉलेजमधील गौरी यांचा विवाह कसा पार पडणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: पहिले लग्न मग ४ वर्षात घटस्फोट, दादा कोंडके यांच्या पत्नीविषयी माहिती आहे का?
'तू भेटशी नव्याने' या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतात. याच आठवणींचा हळवा बंध घेऊन माही आणि तन्वी या दोघांची प्रेमकथा बहरते आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी प्रेमाची ही नवीकोरी गोष्ट दोन काळांतल्या वेगळ्या शैलींत दिसते आहे.
संबंधित बातम्या