मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  New Serial: भूतकाळाची सावली बदलणार भविष्यकाळाची दिशा! नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

New Serial: भूतकाळाची सावली बदलणार भविष्यकाळाची दिशा! नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 12, 2023 02:56 PM IST

Pratishodh Zunj Astitvachi: या मालिकेत तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं उलगडणार आहे

प्रतिशोध
प्रतिशोध (HT)

छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका येत असतात. आता झोनी वाहिनीवर अशी एक मालिका येणार आहे ज्या मालिकेत तृतीयपंथी आणि तिच्या मुलीची कथा दाखवण्यात येणार आहे. प्रतिशोध असे या मालिकेचे नाव आहे. निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 'प्रतिशोध' या नव्या कोऱ्या मालिकेतून अमोल बावडेकर तृतीयपंथी आईची भूमिका साकारणार आहे. ममता असे या व्यक्तिरेखेचे नाव आहे. अमोल बावडेकरबरोबरच पायल मेमाणे ही गुणी अभिनेत्रीसुद्धा पाहायला मिळणार आहे. ती ममताच्या मुलीची म्हणजेच दिशाची व्यतिरेखा साकारताना दिसणार आहे.

प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी ही थरारक मालिका आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल. एक आगळंवेगळं कथानक असलेली ही मालिका सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. येत्या १६ जानेवारीपासून रात्री १० वाजता.
वाचा: तिच्या हिंमतीला माझा सलाम; उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात दीपाली सय्यदची उडी

'प्रतिशोध' - झुंज अस्तित्वाची ही नव्या पठडीतली मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते आहे. या मालिकेत तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं उलगडणारी आहे आणि त्यांच्या संघर्षाची कहाणीही या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नव्या मालिकेतील अमोलची तृतीयपंथीची भूमिका त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरलेली आहे. अशा धाटणीची भूमिका प्रथमच साकारण्याची संधी मिळाल्याने तो या भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे. मालिकेचा पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हे आगळंवेगळं कथानक पाहून प्रेक्षकांनी या मालिकेचं स्वागत केलं आणि अमोलच्या भूमिकेला पसंतीही दर्शवली. अरुण नलावडे आणि अक्षय वाघमारे हे कलाकारही या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.

IPL_Entry_Point

विभाग