सोनू सूद हा असा बॉलिवूड अभिनेता आहे, जो लोकांना केलेल्या मदतीमुळे रातोरात चर्चेत आला होता. कोरोना महामारीच्या काळात त्याने अनेक गरजूंना मदत केली. त्याची लोकांना मदत करण्याची शैली त्याच्या चाहत्यांना खूप आवडते. सोनू सूद भारतीय सुपरहिरो म्हणून नावाजला. आज सोनू सूदचा ३० जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी...
सोनू सूद हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तेथे तो चाहत्यांशी संवाद साधतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो. एकदा सोनू सूद एक्स अकाऊंटवरील ‘आस्क मी सेशन’च्या माध्यमातून गप्पा मारत होता. या सेशनमध्ये एका चाहत्याने त्याला विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या सेशनमध्ये एका युजरने सोनू सूदला एक प्रश्न विचारत लिहिले की, ‘सर देव न करो पण, भविष्यात तुमचे चित्रपट फ्लॉप झाले, तर तुम्ही कॅनडाचे नागरिकत्व स्वीकाराल का?’ या प्रश्नाला सोनू सूदने उत्तर दिलं आहे. सोनू सूद म्हणाला की, ‘माझ्या मित्रा आयुष्य चित्रपटांपेक्षा खूप महत्त्वाचे आहे. आणि भारतापेक्षा श्रेष्ठ दुसरं काहीच नाही.’
आणखी एका युजरने सोनू सूदला सांगितले की, ‘सर कृपया माझ्या पत्नीला गोलूला सांगा की, मी तिच्यावर खूप प्रेम करतो’ यावरही सोनू सूदने उत्तर दिले. त्याने लिहिले की, ‘गोलू भाभी सोहेल भाई तुझ्या प्रेमात आहे. काळजी घ्या भाऊ.’
या सेशनदरम्यान एका युजरने सोनूला विचारले की, ‘लोक त्याला देव म्हणतात, यावर त्याला काय म्हणायचे आहे? यावर उत्तर देताना सोनू सूदने लिहिले की, ‘मी फक्त एक सामान्य माणूस आहे आणि देशातील इतर सामान्य माणसांशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करत आहे.’
वाचा: 'बिग बॉस मराठी ५'च्या घरातील अंकिता वालावलकरचा बॉयफ्रेंडने केला होता छळ, वाचा खासगी आयुष्याविषयी
सोनू सूदचा 'फतेह' चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ते मुख्य अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केले. सायबर गुन्हेगारी आणि भारतातील त्याच्या वाढत्या धोक्याभोवती फिरणाऱ्या या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि जॅकलीन फर्नांडीस यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
संबंधित बातम्या