गेल्या काही दिवसांपासून लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अनेक विचित्र गोष्टी घडताना दिसत आहेत. आपल्या आवडत्या गायकाच्या कॉन्सर्टमध्ये अति उत्साही चाहते काय करतील याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मद्यधुंद अवस्थेत असणारा चाहत भर कॉन्सर्टमध्ये स्टेजवर चढला आणि सोनू निगमच्या दिशेने पळत गेला. पण त्यानंतर सोनू निगमने जे काही केलं ते पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सोनू निगम आदित्य चोप्राच्या २००८ मधील रोमँटिक कॉमेडी रब ने बना दी जोड़ीमधील फिर मिलेंगे चलते चलते गाणे गाताना दिसत आहेत. त्यानंतर एक व्यक्ती स्टेजवर चढतो आणि सोनू निगमच्या दिशेने पुढे चालत जातो. तो चाहता मद्यधुंद अवस्थेत असल्याचे म्हटले जात आहे. चाहता सोनू निगमच्या दिशेने जात असताना बॉडीगार्ड येतात. ते बॉडीगार्ड चाहत्याला पकडतात, खाली उतरवतो आणि नंतर त्याला स्टेजपासून दूर घेऊन जातात. त्याला चांगलाच चोप देतात. एवढ्या वेळात सोनू आणि त्याचा टीम परफॉर्मन्स चालू ठेवतो. तो एकदाही अडखळलेला नाही.
सोनू निगमच्या या वागण्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. एका इन्स्टाग्राम युजरने या व्हिडिओवर हिंदीत कमेंट केली की, काहीही झाले तरी गाणे थांबले नाही. दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे की, अरिजीत सिंग एकदम बरोबर बोलला होता. सोनू निगम कधीही बेसुऱ्या आवाजात गात नाही. तिसऱ्या एका यूजरने म्हटले आहे की, "ते एकदम आश्चर्यकारक होते! सोनूने त्या माणसाला कसे टाळले आणि एकदम गात राहिले?? (सरप्राइज इमोजी) एका कारणास्तव दंतकथा!" चौथ्या एका यूजरने, सोनू इतका अॅक्टिव्ह आहे आणि गाण्यात इतका पारंगत आहे की धावत असतानाही त्याचे लक्ष विचलीत झाले नाही.
वाचा: पाहुण्या कालाकारांच्या भूमिकेत दिसले ४८ कलाकार, बॉक्स ऑफिसवर ठरला होता हिट! ओळखा पाहू
एका व्यक्तीने याची तुलना प्रागमधील नुकत्याच घडलेल्या आणखी एका घटनेशी केली. जेव्हा गायक-अभिनेता निक जोनास स्टेजवरून पळून गेला होता. जोनास ब्रदर्स स्टेजवर परफॉर्म करत असताना अचानक एका व्यक्तीने त्याच्या अंगावर लेझर मारले. ते पाहून निक घाबरला आणि स्टेजवरुन उठून निघून गेला. मात्र, काही युजर्सने या गायकाच्या सुरक्षेवर ही टीका केली आहे. त्यापैकी एकाने कमेंट केली, पण त्यांनी त्याला मारायला नको होते. आणखी एकाने लिहिले की, "तो आपल्या कर्मचार् यांना मारहाण करणे थांबवण्यास सांगू शकला असता. त्याने आपलं गाणं पुढे चालू ठेवायचं ठरवलं आणि त्या माणसाची मारहाण देखील.
संबंधित बातम्या