डिलिव्हरीनंतर सोनम कपूरची मुक्ताफळं; म्हणते, 'मुलांना जन्म देणं हा स्वार्थी निर्णय'
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  डिलिव्हरीनंतर सोनम कपूरची मुक्ताफळं; म्हणते, 'मुलांना जन्म देणं हा स्वार्थी निर्णय'

डिलिव्हरीनंतर सोनम कपूरची मुक्ताफळं; म्हणते, 'मुलांना जन्म देणं हा स्वार्थी निर्णय'

Payal Shekhar Naik HT Marathi
Published Aug 21, 2022 11:05 AM IST

Sonam Kapoor Delivery Baby Boy: फोटोंमध्ये ती अगदी कमी मेकअपमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये सोनम कपूरचा बेबी बम्प स्पष्ट दिसत असून ती कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसत आहे.

<p>सोनम कपूर</p>
<p>सोनम कपूर</p>

sonam kapoor statement on pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या घरात शनिवारी एका नव्या पाहुण्याचं आगमन झाले. सोनमने एका गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर काही वेळातच एका फॅशन मॅगझिनने सोनम कपूरच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो मॅगझिनच्या कव्हर पेजवर शेअर केले. फोटोमध्ये सोनमने बटन नसलेला शर्ट घातलेला आहे आणि तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम आयडीवरून ही पोस्ट देखील शेअर केली आहे.

बटन नसलेल्या ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल

फोटोंमध्ये ती अगदी कमी मेकअपमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये सोनम कपूरचा बेबी बम्प स्पष्ट दिसत असून ती कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसत आहे. डिलिव्हरीच्या काही दिवसांपूर्वीच सोनम लंडनहून भारतात आली होती. या पोस्टसोबत तिने गरोदरपणाबद्दलचे विचारही शेअर केले आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मूल होण्याचा निर्णय स्वार्थी?

सोनमने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, 'तुमची प्राथमिकता बदलते. रोजच्या गोष्टींमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीला प्राधान्य देता ते महत्वाचं ठरतं आणि मला वाटतं की मूल ही माझी प्राथमिकता बनेल. मी सगळ्यात आधी त्याच्याकडे लक्ष देईन. या गोष्टीचं सत्य असं आहे की त्याने या जगात येणं निवडलं नाही. तुम्ही त्यांना इथं आणायचं ठरवलं, म्हणून हा अतिशय सेल्फिश (स्वार्थी) निर्णय आहे.'

अनिल कपूर यांनी आनंद व्यक्त केला

सोनमचे वडील अनिल कपूर यांनी नुकतीच एक पोस्ट टाकून आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, '२० ऑगस्टला आमच्या कुटुंबात नवीन पाहुण्याचं आगमन झाल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सोनम आणि आनंद यांनी एका निरोगी मुलाला जन्म दिला आहे आणि आमच्या आनंदाला या क्षणी कोणतीही सीमा उरलेली नाही.'

Whats_app_banner