बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच आपल्या बिनधास्त आणि विचित्र बोलण्यासाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. ती नेहमीच असं काहीतरी बोलत असते ज्याचा तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नांसोबत दूरदूर पर्यंत काहीही संबंध नसतो. आज ९ जून रोजी सोनम कपूरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या विसरण्याचा एक किस्सा...
सोनमने भाऊ अर्जुन कपूरसोबत करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' मध्ये हजेरी लावली होती. हा भाग रक्षाबंधनच्या दिवशी प्रदर्शित झाला होता. कार्यक्रमात दोघे भाऊ बहीण एकमेकांची पोलखोल करताना दिसत होते. अशातच सोनम रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाबद्दल असं काहीतरी बोलली जे ऐकून तिथे उपस्थित सगळ्यांनीच कपाळाला हात लावला.
वाचा: संघर्ष बिगर काही खरं नसतं!; "आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा" सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
करण तिला विचारतो, आता सध्याच्या परिस्थितीत बॉलिवूडमध्ये असा कोणता अभिनेता आहे जो सगळ्यात जास्त चर्चेत आहे? त्यावर सोनम रणबीरचे नाव घेते. सोनम म्हणते, रणबीर सध्या सगळीकडे चर्चेत आहे. तो सगळीकडे दिसतोय. तो चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतोय. त्याच्या चित्रपटासाठी तो मेहनत करताना दिसतोय जो अयान मुखर्जीसोबत येतोय. त्यानंतर करण त्याला विचारतो की चित्रपटाचे नाव काय आहे? त्यावर सोनम म्हणते की शिवा नं. १. त्यानंतर मात्र करण तिच्याकडे पाहतच राहतो. तर अर्जुन कपूर सोनमकडे पाहत बोलतो तू महान आहेस.
वाचा: गरोदरपणात अभिनेत्रीला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे! जाणून घ्या ही अभिनेत्री आहे तरी कोण?
शोमध्ये सोनम अर्जुनला विचारते की त्याला तिची कोणती सवय आवडत नाही, तेव्हा अभिनेता म्हणतो, 'तु कधीही कोणाच्या प्रतिक्रियेची वाट पाहत नाही. सोनम मला विचारेल अर्जुन कशी दिसतेय मी? मग ती स्वतः म्हणेल की मी त्यात छान दिसत आहे, नाही का? त्यामुळे जर तुला तुझं कौतुक करायचं असतं तर मग विचारतेस कशाला?'
वाचा: राजेश खन्नासोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून डिंपल कपाडीया 'या' अभिनेत्याला करत होत्या डेट
सोनमने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिने मुलाचे नाव वायू ठेवल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पण तिने या सगळ्यावर बोलणे नेहमीच टाळले आहे.
संबंधित बातम्या