आजकाल अनेक कलाकार हे त्यांच्या मुलांना सोशल मीडियापासून लांब ठेवतात. त्यांचे फोटो शेअर करताना दहावेळा विचार करतात. पण काही महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म देणारी अभिनेत्री सोनम कपूर याला अपवाद ठरली आहे. तिने सोशल मीडियावर मुलाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पती आनंद आणि मुलगा वायूसोबत परदेशात फिरायला गेल्याचे दिसत आहे. आनंद गाडी चालवत असतो आणि सोनम व्हिडीओ शूट करत आहे. त्यानंतर ते दोघेही मुलासोबत खेळताना दिसत आहेत. ते तिघेही अतिशय आनंदी दिसत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून सोनमच्या मुलाची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. या व्हिडीओ अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
वाचा: ‘तारक मेहता..’मधील मुनमुन दत्ताचा अपघात, गंभीर दुखापत
सोनम कपूरने २० ऑगस्ट रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलाचे नाव वायू ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर सोनमला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. 'असं मुलाचे नाव कोण ठेवतं' असे म्हणत यूजरने सुनावले होते.
संबंधित बातम्या