Sonam Kapoor: सोनम कपूरने मुंबईत खरेदी केले आयकॉनिक रिदम हाऊस, किंमत ऐकून बसेल धक्का
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sonam Kapoor: सोनम कपूरने मुंबईत खरेदी केले आयकॉनिक रिदम हाऊस, किंमत ऐकून बसेल धक्का

Sonam Kapoor: सोनम कपूरने मुंबईत खरेदी केले आयकॉनिक रिदम हाऊस, किंमत ऐकून बसेल धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 24, 2024 06:20 PM IST

Sonam Kapoor: सोनम कपूरने १९४० साली सुरु करण्यात आलेले सुप्रसिद्ध स्टोअर खरेदी केले आहे. या दुकानाची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

Sonam Kapoor (Photo by Prodip Guha/ Hindustan Times) (Hindustan Times)
Sonam Kapoor (Photo by Prodip Guha/ Hindustan Times) (Hindustan Times) (Photo by Prodip Guha/ Hindustan Time)

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या लग्झरी लाइफसाठी विशेष ओळखले जातात. ते कायम महागडी घरे, लग्झरी गाड्या खरेदी करताना दिसतात. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजाने मुंबईत नवे स्टोअर खरेदी केले आहे. या स्टोरअरची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

२०१६मध्ये नीरव मोदीकडे होती मालकी

अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीकडून रिदम हाऊस खरेदी केले आहे. या रिदम हाऊसची किंमत ४७.८० कोटी रुपये आहे. १९४० मध्ये सुरू झालेल्या या सुप्रसिद्ध स्टोअरमध्ये मुंबईतील काही उत्तमोत्तम इंस्टूमेंटचा साठा आहे. हे इंस्ट्रूमेंट संगीत क्षेत्रात वापरण्यात आले होते. मात्र, डिजिटल प्लॅटफॉर्मचे आक्रमण झाल्यामुळे २०१६मध्ये दुकान बंद करण्यात आले. २०१७मध्ये नीरव मोदीने कर्माली कुटुंबाकडून रिदम हाऊस खरेदी केले. तेव्हा ही डिल ३२ कोटी रुपयांना झाली होती. काही दिवसांनी म्युझिक स्टोअरचे रुपांतर लक्झरी ज्वेलरी शोरूममध्ये करण्यात आले होते.

२०२०मध्ये आणण्यात आली जप्ती

२०१८च्या सुरुवातीला २८ हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मोदी कुटुंबीय हे परदेशात पळून गेले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने काळा घोडा परिसराच्या मध्यभागी असलेली ३६०० चौरस फुटांची ही मालमत्ता जप्त केली. मालमत्ता जप्त केल्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) पंजाब नॅशनल बँकेसह इतर बँकांसह वित्तीय संस्थांचे नुकसान भरून काढण्यासाठी रिदम हाऊसचे लिक्विडेशन करण्याचे आदेश दिले होते. रिदम हाऊससह मोदींच्या मालमत्तेच्या विक्रीवर देखरेख ठेवण्यासाठी एनसीएलटीने एका रिझोल्यूशन प्रोफेशनलची नेमणूक केली होती.

गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेले हे दुकान शाही एक्सपोर्टची उपकंपनी भाणे यांनी नुकत्याच झालेल्या लिलावात विकत घेतले. कंपनीच्या प्रवक्त्याने या व्यवहाराला दुजोरा दिला आणि सांगितले की, मुंबईत त्यांची किरकोळ उपस्थिती वाढविण्यासाठी या जागेचा वापर केला जाईल.
वाचा: एका क्रिकेट मॅचमुळे गेला 'या' मराठमोळ्या अभिनेत्याचा जीव, वाचा नेमकं काय झालं

सोनम कपूरने खरेदी केले हे दुकान

आता मुंबईतील काला घोडा परिसर येथील आयकॉनिक रिदम हाऊस हे सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजाने खरेदी केले आहे. त्यांनी ही मालमत्ता ४७ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केली आहे. सध्या सर्वत्र या आयकॉनिक रिदम हाऊसची चर्चा सुरु आहे.

Whats_app_banner